पुरंदर राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी अध्यक्ष शिवाजी पोमण यांचे हृदयविकाराने निधन 

त्यांच्या काळापासूनच नीरा बाजार समिती आर्थिकदृष्टया सक्षम होण्यास सुरुवात झाली होती.
NCP's Purandar Former president Shivaji Poman dies of heart attack
NCP's Purandar Former president Shivaji Poman dies of heart attack

गराडे (जि. पुणे) : राष्ट्रवादी काँग्रेसचे पुरंदर तालुक्याचे माजी अध्यक्ष तथा पुणे जिल्हा परिषदेच्या जलसंधारण समितीचे स्वीकृत सदस्य शिवाजीअप्पा भिकुलाल पोमण (वय ५३) यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने शनिवारी (ता. ३ एप्रिल) दुपारी निधन झाले. 

शिवाजी पोमण हे पिंपळे गावचे रहिवासी होते. त्यांच्या मागे आई, पत्नी, एक मुलगा, दोन मुली, दोन भाऊ, भावजय असा परिवार आहे. सेवानिवृत्त पोलिस अधिकारी रमेश पोमण व व्यावसायिक विजय पोमण हे त्यांचे बंधू होत. 

पोमण यांना २९ मार्च रोजी हृदयविकाराचा धक्का बसला होता. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असतानाच शनिवारी (ता. ३ एप्रिल) दुपारी दोनच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. 

पुरंदर तालुक्यातील नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, अजित नागरी पतसंस्थेचे संचालक या पदांच्या माध्यमातून त्यांनी तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस भक्कम करण्याचा प्रयत्न केला. तोट्यात गेलेली नीरा बाजार समिती ऊर्जितावस्थेत आणण्यासाठी शिवाजी पोमण यांनी आपल्या सव्वा वर्षाच्या कालावधीत मोठे प्रयत्न केले होते. त्यांच्या काळापासूनच नीरा बाजार समिती आर्थिकदृष्टया सक्षम होण्यास सुरुवात झाली होती. पोमणे हे १९९७ -२००२ या कालावधीत पुरंदर पंचायत समितीचे सदस्यही होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ते गेली १७ वर्षांपासून रक्तदान शिबिराचे आयोजन करत होते. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्ती म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांचे आमदारकीचे स्वप्न मात्र अपुरेच राहिले आहे. त्यांच्या निधनामुळे पुरंदर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मोठी हानी झाली आहे. 
 

पुरंदर राष्ट्रवादीने मार्गदर्शक व्यक्तिमत्त्व गमावले  ः सुप्रिया सुळे

पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी अध्यक्ष व पुणे जिल्हा परिषदेच्या जलसंधारण समितीचे स्वीकृत सदस्य शिवाजीअप्पा पोमण यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त धक्कादायक आहे. नुकतेच त्यांना हृदयविकाराचा धक्का बसला होता. त्यातून ते बाहेर येतील, असा आम्हा सर्वांना विश्वास होता. पण, त्यांचे याच आजारात निधन झाले. ही घटना दुःखद असून राष्ट्रवादी काँग्रेसने पुरंदर तालुका व परिसरातील एक मार्गदर्शक व्यक्तिमत्त्व गमावले. पोमण कुटुंबीयांवर कोसळलेल्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत, अशा शब्दांत खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com