शरद पवार म्हणाले, फक्त दोन तास प्रचारासाठी आलो, तरीही मला विक्रमी मतदान! - NCP President Sharad Pawar inaugurated the 45 meter high national flag at Warje area in Pune | Politics Marathi News - Sarkarnama

शरद पवार म्हणाले, फक्त दोन तास प्रचारासाठी आलो, तरीही मला विक्रमी मतदान!

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 23 जानेवारी 2021

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते पुण्यातील वारजे परिसरामध्ये उभारण्यात आलेल्या 45 मीटर उंचीच्या ध्वजस्तंभाचे उद्घाटन करण्यात आले.

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते पुण्यातील वारजे परिसरामध्ये उभारण्यात आलेल्या 45 मीटर उंचीच्या ध्वजस्तंभाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर शरद पवार यांनी वारजे परिसराविषयीच्या काही आठवणींना उजाळा दिला. मी पूर्वी याच खडकवासला मतदारसंघात प्रचाराला दोन तासांसाठी यायचो. मात्र, या मतदारांनी मला मतांचा विक्रम करून दिला आहे. या भागात नागरिक पुर्वी शेती करायचे आता, मात्र मी कुठे आलो आहे, हेच कळत नाही, असे त्यांनी सांगितली. 

वारजे परिसराचा झालेला विकास पाहून पवार म्हणाले, 'जो लोकांसाठी जगतो, त्यांना लोक  कधीही विसरत नाहीत. याचा मला 50 वर्षांचा अनुभव आहे. महापालिकेचा सदस्य जागृत असेल तर आपला परिसर कसा बदलतो, याचे उदाहरण म्हणजे हा परिसर आहे. एवढा बदल या परिसरात झाला आहे. नागरीक विविध भागातून राहायला आले आहेत. त्यामुळे शेतीऐवजी आता सोसायट्या वाढल्या. वारजे त्यामुळेच बदलत आहे.' 

या कार्यक्रमामध्ये खासदार सुप्रिया सुळेही उपस्थित होत्या. वारजेच्या जवळ एन. डी. ए. आहे. त्यामुळे आपल्या देशाचा अभिमान म्हणून येथे हा देशाचा भव्य ध्वज उभारण्यात आल्याचे खासदार सुळे यांनी सांगितले.  

वारजे परिसरामध्ये नगरसेवक सचिन दोडके यांच्या प्रयत्नातून 45 मीटर उंचीच्या ध्वजस्तंभाची उभारणी करण्यात आली आहे. उद्घाटनप्रसंगी आमदार चेतन तुपे, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ, नगरसेवक सचिन दोडके,  लक्ष्मी दुधाने, दिलीप बराटे,  सायली वांजळे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर, स्वाती पोकळे, दीपक मानकर, बाबुराव चांदेरे, काका चव्हाण, अनिता इंगळे, योगेश दोडके, शुक्राचार्य वांजळे, बाबा धुमाळ आदी उपस्थित होते. 

Edited By Rajanand More

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख