चंद्रकांतदादा, आपल्यातील बरेच नेते जामिनावरच बाहेर आहेत...सगळ्याची चौकशी होणार...चाकणकरांचे प्रत्युत्तर - NCP leader Rupali Chakankar criticizes BJP leader Chandrakant Patil | Politics Marathi News - Sarkarnama

चंद्रकांतदादा, आपल्यातील बरेच नेते जामिनावरच बाहेर आहेत...सगळ्याची चौकशी होणार...चाकणकरांचे प्रत्युत्तर

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 3 मे 2021

आमदार महोदयांनी मग्रूरपणा दाखवत इतरांशी बोलू नये.

पुणे : पश्चिम बंगालच्या निवडणुकीनंतर राष्ट्रवादी कॅाग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी केलेल्या विधानानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भुजबळ जामीनावर सुटले आहेत. अजून निर्दोष सिद्ध झाले नाहीत. त्यामुळं फार जोरात बोलू नका, अन्यथा फार महागात पडेल, अशी धमकीच दिली आहे. चंद्रकांत पाटलांच्या या धमकीवर आता राष्ट्रवादी कॅाग्रेस महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकरानी यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. चाकणकर यांनी टि्वट करत चंद्रकांत पाटलांचा समाचार घेतला आहे. 

 "साधी आपली ग्रामपंचायत सुद्धा ज्यांना आपल्या ताब्यात ठेवता आली नाही, अशा  आमदार महोदयांनी मग्रूरपणा दाखवत इतरांशी बोलू नये. आपल्यातील बरेच नेते जामिनावरच बाहेर आहेत,थोडं मागे वळून पाहिलं तर आपला इतिहास आपल्या लक्षात येईल," असे टि्वट रुपाली चाकणकर यांनी केलं आहे. 

आपल्या टि्वटमध्ये रुपाली चाकणकर म्हणतात, "चंद्रकांतदादा पाटील, कोल्हापूर पुर परिस्थितीत आपण केलेल्या दैदिप्यमान कामगिरीमुळे, आपल्याला आपला मतदार संघ सोडून आमच्या पुण्यातील एका महिलेचा सुरक्षित मतदार संघ निवडावा लागला..सुज्ञास फार न सांगावे लागे !! जलयुक्त शिवार, चिक्की घोटाळा, मुंबई बँक घोटाळा ते पाटबंधारे विभाागामधील प्रकरणे अशा अनेक घोटाळ्यांची चौकशी बाकी आहे. परंतु सध्याच्या परिस्थितीमध्ये लोकांच्या आरोग्याचा विषय हा आमचा मुख्य मुद्दा आहे, त्यामुळे आम्ही शांत आहोत. या दुष्टचक्रातून एकदा बाहेर पडलो की सगळ्याची चौकशी होणार आहे."

हेही वाचा : ठाकरे सरकारची घरात बसून घोषणाबाजी..फडणवीस करताहेत रस्त्यावर उतरुन काम...
 
मुंबई  :  राज्य सरकार केवळ घरात बसून घोषणा देत असताना भाजपचे कार्यकर्ते मात्र रस्त्यावर उतरून काम करीत आहेत व आपली जबाबदारी पूर्ण करीत आहेत, असा टोला विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राज्य सरकारला लगावला. जोगेश्वरी तसेच नवी मुंबईतील उलवे येथे भारतीय जनता पक्षातर्फे उभारलेल्या कोविड केअर सेंटरचे लोकार्पण नुकतेच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी दरेकर यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले.   
Edited by : Mangesh Mahale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख