राष्ट्रवादी कॅाग्रेसच्या नगरसेवकाचा कोरोनामुळे मृत्यू  

नगरसेवक दत्ता साने (वय५४) यांचे कोरोनामुळे शनिवारी सकाळी निधन झाले आहे. चिंचवड येथील एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
0Datta_sane---Copy4.
0Datta_sane---Copy4.

पिंपरी : पिंपरी - चिंचवड महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विद्यमान नगरसेवक दत्ता साने (वय५४) यांचे कोरोनामुळे शनिवारी सकाळी निधन झाले आहे. चिंचवड येथील एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.  

येथील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर 25 जूनपासून उपचार सुरु होते. त्यांना न्यूमोनिया झाल्याचे तपासणीत आढळले होते. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, दोन भाऊ असा परिवार आहे.

लॅाकडाउनच्या काळात त्यांनी आपल्या परिसरातील नागरिकांना दररोज अन्नधान्य वाटप करीत होते. त्यामुळे त्यांचा सतत नागरिकांशी संपर्क येत होता. यामुळे त्यांना कोरोनाची लागण झाली असावी. 25 जून ला त्यांचा कोरोना अहवाल पॅाझिटिव्ह आला होता.

विरोधी पक्षनेते म्हणून महापालिकेत त्यांचे काम उल्लेखनीय होते. चिखली येथून ते तीनवेळी नगरसेवकम्हणून निवडून आले होते. महापालिकेतील भष्ट्राचाराच्या अनेक प्रकरणांवर साने यांनी आवाज उठविला होता. त्यांचा जनसंपर्क मोठा होता. 

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील दोन पोलिस निरीक्षकांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयात कोरोना विषाणूने सुमारे महिनाभरापूर्वी प्रवेश केला आहे. पोलिस कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांचा देखील कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे.

आयुक्तालयातील दोन पोलिस निरीक्षकांचा अहवाल सोमवारी (29 जून) पॉझिटिव्ह आला आहे. पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयात आतापर्यंत सतरा जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील चौदा जण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोनामुक्त झालेले बहुतांश पोलिस संपूर्ण उपचारानंतर ड्यूटीवर हजर झाले आहेत. आयुक्तालयातील चार पोलिसांवर शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com