मोठी बातमी : राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांना अटक 

शनिवारी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यालयाच्या उद्‌घाटनप्रसंगी कोरोनासंबंधीच्या नियमांचे सर्रासपणे उल्लंघन करीत मोठ्या प्रमाणात गर्दी झाली
  Prashant Jagtap .jpg
Prashant Jagtap .jpg

पुणे : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या (NCP) शहर कार्यालयाच्या उदघाटनासाठी जमलेल्या गर्दीला जबाबदार धरून शहराध्यक्ष प्रशांत जगताप, प्रदेश प्रतिनिधी प्रदीप देशमुख, माजी नगरसेवक निलेश निकम यांच्यासह सुमारे दीडशे कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंत या प्रकरणात राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांना शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली.  (NCP city president Prashant Jagtap arrested) 

कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर लग्नासाठी 50 व्यक्ती, अंत्यसंस्कारासाठी 20 व्यक्ती, सार्वजनिक कार्यक्रमांसाठी आसनक्षमतेच्या 50 टक्के उपस्थितीची मर्यादा नागरीकांसाठी आहे. मात्र शनिवारी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यालयाच्या उद्‌घाटनप्रसंगी कोरोनासंबंधीच्या नियमांचे सर्रासपणे उल्लंघन करीत मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. या गर्दीवरुन उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी नाराजीही व्यक्त करीत कार्यकर्त्यांचे कान टोचले. असे असले तरीही या गर्दीने पुणेकरांच्या मनात धडकी भरविल्याचे चित्र होते. 

नागरीकांनी मास्क न घातल्यास पोलिसांकडून त्यांच्याविरुद्ध दंडात्मक कारवाई केली जाते. तर राष्ट्रवादीच्या कार्यक्रमास सुमारे 400 ते 500 हून अधिक कार्यकर्ते सहभागी झाले होते. अनेकांनी मास्क घातले नव्हते. अशा प्रकारे कार्यकर्त्यांनी नियमांचे उल्लंघन केले तरीही, पोलिसांकडून त्यांच्यावर कारवाई का नाही, असा प्रश्‍न नागरीकांकडून उपस्थित केला जात होता. 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमातील गर्दीप्रकरणी पोलीस काय कारवाई करणार, अशी चर्चा सोशल मिडीयातून सुरू झाली असताना पोलिसांनी या गर्दीचे फोटो व व्हिडीओ तपासून जगताप, प्रदीप देशमुख, निलेश निकम यांच्यासह सुमारे दीडशे जणांच्या विरोधात बेकायदा गर्दी जमवल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर पुढील कारवाई करत शिवाजीनगर पोलिसांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना अटक केली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com