प्रसिद्ध दिग्दर्शिका सुमित्रा भावे  यांचे पुण्यात निधन - National Film Award winner Director Sumitra Bhave dies  | Politics Marathi News - Sarkarnama

प्रसिद्ध दिग्दर्शिका सुमित्रा भावे  यांचे पुण्यात निधन

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 19 एप्रिल 2021

दिग्दर्शिका सुमित्रा भावे (वय ७८) यांचे आज पुण्यात निधन झाले.

पुणे : 'दहावी फ', 'वास्तुपुरुष', 'देवराई', 'बाधा', 'नितळ', 'एक कप च्या', संहिता, 'घो मला असला हवा', 'कासव', 'अस्तु' अशा गाजलेल्या चित्रपटाच्या दिग्दर्शिका सुमित्रा भावे (वय ७८) यांचे आज पुण्यात निधन झाले. खासगी रुग्णालयात आज सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. काही दिवसांपासून त्या आजारी होत्या. 
 

सुमित्रा यांनी अनेक चित्रपट, मालिका आणि लघुपटांचं लिखाणही केलं आहे. ऑल इंडिया रेडिओ (नवी दिल्ली) येथे मराठी भाषेच्या वृत्तनिवेदिका म्हणूनही त्यांनी काम केले आहे. त्यांच्या अनेक चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.  चित्र रत्न पुरस्कार आणि कामधेनू पुरस्कारही त्यांना मिळाला. सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर यांनी अनेक प्रतिभावान चित्रपट बनवले, त्यांना विविध पुरस्कार मिळाले आहेत.

पुण्यात 12 जानेवारी 1943 रोजी सुमित्रा भावे यांचा जन्म झाला. फर्ग्युसन महाविद्यालयातून त्यांनी पदवी शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर पुणे विद्यापीठातून राज्यशास्त्र आणि समाजशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी संपादन केली. तर टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस, मुंबई येथून पॉलिटिकल सायन्स अँड सोशोलॉजी या विषयात पदव्युत्तर पदवीही मिळवली. सुमित्रा भावे या विविधा सामाजिक संस्थेत कार्यरत होत्या.  
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख