भगतसिंग कोश्यारी म्हणून बोलत असतील तर; त्यांना खुर्ची सोडावी लागेल!

माझी तक्रार देशाच्या प्रमुखांकडे देखील होते
 Nana Patole, Bhagat Singh Koshyari .jpg
Nana Patole, Bhagat Singh Koshyari .jpg

पुणे : नेहरूंच्या धोरणामुळे देश कुमकुवत झाल्याची टीका राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी केली होती. राज्यपालांनी नेहरूंवर केलेल्या टीकेला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी उत्तर दिले आहे. पंडित नेहरू यांच्यावरील टीका राज्यपालांना शोभत नाही. त्यांनी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता बनावे, मग त्यांनी स्वातंत्र्य आहे का, यावर बोलावे, असे पटोले यांनी म्हटले आहे. (Nana Patole criticizes Governor Bhagat Singh Koshyari) 

पटोले यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले ''काँग्रेसमध्ये जहाल आणि मवाळ असे दोन गट होते. त्यापैकी पटोले जहाल गटातील असल्याची टीका झाल्याबद्दल त्यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर पटोले म्हणाले, माझी तक्रार देशाच्या प्रमुखांकडे देखील होते. माझी पक्षाकडे तक्रार होत नाही. हा पटोले देशासाठी लढणारा आहे. काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून देशाचे स्वातंत्र्य अबाधित राहावे. देशातील जनतेला न्याय मिळावा, ही भूमिका माझ्या मनात आहे. अन्याय करणाऱ्या व्यवस्थेविरोधात आवाज उठवणे त्याला जहाल व्यक्तिमत्त्व म्हटले जाते. असे त्यांचे मत असेल की, जहाल आहे; तर जहाल आहे''

नेहरू यांच्यावरील टीका राज्यपाल यांना शोभत नाही. त्यांनी भाजपचा कार्यकर्ता बनावे आणि मग त्यांना स्वातंत्र्य आहे का, यावर बोलावे. राज्यपालांच्या खुर्चीवर बसून अशा प्रकारची टीका करण्याचे अधिकार राज्यपालांना नाहीत. ते भगतसिंग कोश्यारी म्हणून बोलत असतील तर तो त्यांचा अधिकार आहे. मात्र, मग त्यांना ती खुर्ची सोडावी लागेल. आम्ही त्यांना उत्तर काय द्यायचे ते निश्चित देऊ, असेही पटोले यांनी सांगितले. 

स्पर्धा परीक्षेच्या उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्याच्या जागा ३१ जुलै पर्यंत भरल्या जाणार अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिवेशनात केली होती. ती मुदत उलटून गेली आहे. त्यावर पटोले म्हणाले की, या प्रश्नासाठी आम्ही अजित पवारांची भेट घेणार आहोत. तातडीने सर्व जागा भराव्यात अशी मागणी करणार आहे. तसेच या डेडलाईनची आठवण देखील त्यांना करून देऊ, असेही पटोले म्हणाले. 

कोश्यारी काय म्हणाले होते?
 
अटलबिहारी वाजपेयी यांचा कार्यकाळ सोडून दिला, तर त्याआधी वाटले की देशाच्या सुरक्षेकडे लोकांचे लक्ष खूप कमी आहे. मी पंडित जवाहरलाल नेहरुंचा खूप आदर करतो; मात्र, त्यांची कमजोरी होती. त्यांना वाटायचे की, शांतीदूत बनावे, कबूतरे उडवावी. त्यामुळे देश कमकुवत झाला आणि खूप काळापर्यंत हे सुरुच होते. १९९८ मध्ये पंतप्रधान झाल्यानंतर अटलबिहारी वाजपेयी यांनी अणुबॉम्बची चाचणी केली. सरकार घाबरायचे मात्र, आमच्या वाजपेयीजींनी चाचणी घडवून आणली.  असे राज्यपाल म्हणाले होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com