'भीमा पाटस` ला बुडविणारे दिवाळीत तुरूंगात जातील` 

भाजपचे आमदार असले तरी पक्षाचा भ्रष्टाचाराला पाठिंबा नाही.
Namdev Takvane (15).jpg
Namdev Takvane (15).jpg

दौंड : दौंड (Dound) तालुक्यातील शेतकर्यांनी चाळीस वर्षांपूर्वी उभ्या केलेल्या भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याचे संगनमताने खासगीकरण करण्याचा डाव आहे. तालुक्यात सहकार मोडीत काढून खासगीकरणाच्या माध्यमातून लूट करण्याचे मोठे षडयंत्र रचण्यात आले आहे, असा गंभीर आरोप भारतीय जनता पक्षाचे नेते तथा कारखान्याचे माजी संचालक नामदेव ताकवणे (Namdev Takwane) यांनी केला आहे.

 दौंड शहरात ३ सप्टेंबर रोजी पत्रकार परिषदमध्ये नामदेव ताकवणे यांनी हे मत व्यक्त केले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजेंद्र कदम यावेळी उपस्थित होते. 

नामदेव ताकवणे म्हणाले, ``भीमा साखर कारखान्याचे चेअरमन तथा आमदार राहुल कुल आणि पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे चेअरमन तथा माजी आमदार रमेश थोरात हे बंद कारखान्याच्या कारभाराविषयी तक्रार न करता फक्त चौकशीची मागणी करून नुरा कुस्ती खेळत आहेत. दोघेही चौकशीची मागणी करतात. परंतु प्रत्यक्षात कोठेही तक्रार करून दाद मागत नाहीत. दोघांमध्ये `अंडरस्टॅंडिंग` असून कारखान्याच्या बाबत सभासदांची फसवणूक करीत आहेत. जिल्हा बॅंकेने कारखान्याविरूध्द दीडशे कोटी रूपयांच्या थकबाकी वसुली प्रकरणी दिरंगाई का केली आणि कारखान्यावर जप्तीची वेळ कोणी आणली, हे स्पष्ट झाले पाहिजे. जप्तीची कारवाई संशयास्पद आहे. 

ते पुढे म्हणाले, `` दौंड तालुक्यात ४० लाख मेट्रीक टन उसाचे क्षेत्र आहे. तीन खासगी साखर कारखाने आणि साडेपाचशे गुर्हाळे सुरू असताना ऊस शिल्लक राहत आहे. भीमा सहकारी साखर कारखाना ऊसा अभावी बंद पडलेला नसून आर्थिक डबघाईमुळे बंद पडला आहे. या डबघाईला नेमकं जबाबदार कोण ?, हे चौकशीतून एकदा स्पष्ट झालेच पाहिजे. बंद कारखाना सुरू होणे गरजे आहे. ``

ते दिवाळीला कारागृहात जातील 

भाजपचे आमदार राहुल कुल हे कारखान्याचे चेअरमन म्हणून जर दोषी असतील तर त्यांनी शिक्षा भोगायची तयारी ठेवावी. भाजपचे आमदार असले तरी पक्षाचा भ्रष्टाचाराला पाठिंबा नाही. सखोल चौकशीनंतर कदाचित आमदार राहुल कुल आणि माजी आमदार रमेश थोरात हे दोघेही दोषी नसतील. परंतु कारखान्याच्या भ्रष्ट कारभारासाठी जे दोषी असतील ते येत्या दिवाळीला मात्र कारागृहात जातील, असा दावा नामदेव ताकवणे यांनी केला.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com