IPS वैभव निंबाळकर यांची सुप्रिया सुळेंनी घेतली भेट

वैभवनिंबाळकर त्यांच्यावरसध्या उपचार सुरू आहेत.
Sarkarnama - 2021-09-15T141517.654.jpg
Sarkarnama - 2021-09-15T141517.654.jpg

पुणे : आसाम मिझोराम राज्यांच्या बॉर्डरवर झालेल्या गोळीबारामध्ये आयपीएस (IPS)अधिकारी वैभव चंद्रकांत निंबाळकर (Vaibhav Nimbalkar) हे ता. २२ जुलै रोजी गंभीर जखमी झाले होते. त्यांना लष्करी विमानाने मुंबई येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया झाली असून सध्या उपचार सुरू आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी निंबाळकर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.  

आसाम - मिझोराम बॉर्डरवर कर्तव्यावर असताना जुलै महिन्यात झालेल्या गोळीबारात ते जखमी झाले. त्यानंतर त्यांना मुंबई येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. नुकतेच त्यांना पोलीस दलातील उत्कृष्ट सेवेसाठी आसाम राज्याचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनवाल यांनी सन्मानित केले. आसामच्या पोलीस महासंचालकांकडूनही सुवर्णपदक मिळाले आहे.

याबद्दल खा.सुळे यांनी त्यांची भेट घेऊन अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. यावेळी वैभव यांच्या पत्नी अनुजा, वडील चंद्रकांत निंबाळकर, आई संगिताताई निंबाळकर, त्यांची बहीण व अभिनेत्री उर्मिला निंबाळकर,  सुकिर्त गुमास्ते, शीतलताई गोरे आदी उपस्थित होते. खासदार सुळे म्हणाल्या, ''निंबाळकर कुटुंबीय प्रेरणादायी आहे. या सर्वांना भेटून अतिशय छान वाटले. वैभव हे लवकर बरे व्हावेत ही सदिच्छा व्यक्त करते.''

स्मृती इराणींच्या विरोधात प्रियंका गांधी निवडणुकीच्या रिंगणात
वैभव निंबाळकर यांची वयाच्या २२ व्या वर्षी युपीएसएसी उत्तीर्ण झालेले व भारतातील सर्वात तरुण आयपीएस अधिकाऱ्यांपैकी एक अधिकारी, अशी त्यांची ओळख आहे. ते मूळचे इंदापूर तालुक्यातील सणसर येथील असून त्यांचे शालेय शिक्षण बारामती येथे झाले आहे. एस.डी.पी.ओ, बोकाखाट म्हणून काम करताना आसाममधील डी.जी.पीं.कडून उत्कृष्ट नेतृत्व आणि आदर्श व्यावसायिक क्षमतेबद्दल त्यांना प्रशस्तीपत्र मिळाले आहे. 

काझिरंगा नॅशनल पार्क येथील एकशिंगी गेंड्यांच्या शिकारी व शिंगांची तस्करी करणाऱ्या आरोपींना त्यांनी अटक केली होती. उल्फा, के.पी.एल.टी., एन.डी.एफ.बी. सारख्या अतिरेकी संघटनांविरुद्ध दहशतवादविरोधी कारवायांचे त्यांनी नेतृत्व केले आहे. याखेरीज 'कम्युनिटी पोलिसिंग'चे ते समर्थक असून जादूटोणा, अंमली पदार्थ, व्यसनमुक्ती, सायबर क्राइम इत्यादी सामाजिक गुन्ह्यांबाबत जनजागृती करण्यासाठी विविध सामाजिक उपक्रम त्यांनी राबवले आहेत.

''खासदार सुप्रिया सुळे यांनी आज माझ्यासमवेत कुटुंबियांची सदिच्छा भेट घेतली. माझ्या आरोग्याची आपुलकीने विचारपूस केली. त्याबद्दल माझ्यासाठी आणि आमच्या कुटुंबियांसाठी आनंदाची व समाधानाची बाब आहे.''
वैभव निंबाळकर 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com