सुप्रिया सुळेंनी केली राज्य सरकारकडे १२ कोटींची मागणी..राऊतांशी चर्चा..

पुरंदर, बारामती तालुक्यात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेला तत्काळ मंजुरी मिळावी,असे सुळे म्हणाल्या.
Sarkarnama Banner - 2021-06-04T121519.089.jpg
Sarkarnama Banner - 2021-06-04T121519.089.jpg

मुंबई : बारामती लोकसभा मतदारसंघातील मुळशी आणि वेल्हे तालुक्याच्या दुर्गम भागातील वाड्या-वस्त्यांपर्यंत वीज पोहोचविण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारकडे  १२ कोटी रुपयांची मागणी केली. बारामती लोकसभा मतदारसंघातील उर्जा विभागाच्या विविध प्रश्नांविषयी राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत यांच्या दालनामध्ये बैठक झाली. या बैठकीत मुळशी व वेल्हे या तालुक्यातील वाड्या-वस्त्यांसाठी १२ कोटी रुपयांच्या निधीची आग्रही मागणी सुळे यांनी केली. mp Supriya Sule demands Rs 12 crore from state government

रहाटणी ते वरसगाव सब स्टेशनला आणखी एक वीज वाहिनी द्यावी तसेच भाटघर येथील १३२ केव्ही सब स्टेशनच्या दुरुस्तीसाठी निधी मिळावा, असेही सुळे म्हणाल्या. पुरंदर आणि बारामती तालुक्यात मुख्यमंत्री सौर कृषी  वाहिनी योजनेला तत्काळ मंजुरी मिळावी हा मुद्दा देखील या बैठकीत सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला.

बारामती,दौंड, पुरंदर, भोर, वेल्हा, मुळशी, इंदापूर, हवेली हे तालुके आणि खडकवासला विधानसभा मतदार संघात एकूण २२ ठिकाणी नवीन सब स्टेशन उभारणी साठी मंजुरी मिळावी अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली. यावेळी उर्जा विभागाचे महाव्यवस्थापक विजय सिंघल व बारामती लोकसभा मतदारसंघाचे समन्वयक प्रवीण शिंदे उपस्थित होते. 

 मंगलदास बांदलांवर आणखी एक गुन्हा दाखल  
शिक्रापूर  (जि. पुणे) : पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम समितीचे माजी सभापती मंगलदास बांदल यांचा २६ मे पासून पोलिस कोठडीत राहण्याचा सिलसिला आजही कायम होता. कारण, बुधवारी (ता. २ जून) शिरुर न्यायालयाने एका प्रकरणात न्यायालयीन कोठडी सुनावताच त्यांच्यावर दोन कोटींच्या फसवणूकीचा आणखी एक गुन्हा दाखल झाला आणि पुन्हा त्यांना न्यायालयाने आणखी एक दिवसांची पोलिस कोठडी वाढविली. दरम्यान ताज्या गुन्ह्यात त्यांच्या पत्नी व जिल्हा परिषद सदस्या रेखा बांदल यांचे भाऊ दिनेश कामठे यांचा समावेश आहे, अशी माहिती शिरूरचे पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी दिली  
Edited by : Mangesh Mahale 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com