पुणे : भाजपाचे प्रदेशाध्यक्ष, आमदार चंद्रकांत पाटील यांनी काल पुण्यात दिवंगत राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांच्याविषयी चुकीचे विधान केले. त्यामुळे ते चर्चेत आले आहेत. 'अब्दुल कलाम यांना नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती केलं,' असं चुकीचं विधान चंद्रकांत पाटील यांनी काल केलं होत.
या त्यांच्या विधानावरून सोशल मीडियावर खोचक टीका होत आहेत. नेटकऱ्यांनी पाटील यांना ट्रोल केलं आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज पुण्यात पत्रकार परिषदेत चंद्रकांत पाटील यांच्या त्या विधानाचा समाचार घेतला. संजय राऊत म्हणाले की, त्यांच्या व्यक्तव्यामुळे त्यांचेच हसं होत आहे. काही जणांना श्रेय़ घेण्याची सवय असते. डाँ कलाम हे सर्वमान्य उमेदवार होते. कलाम यांना राष्ट्रपतीपदाचे उमेदवार करण्यात अटलबिहारी वाजपेयी, आणि प्रमोद महाजन यांचा वाटा होता. कलाम उमेदवार व्हावेत, म्हणून सर्व पक्षांच्या नेत्यांनी प्रयत्न केले होते.
बार्शीमध्ये नव्या युतीचे संकेत...राऊतांच्या विरोधात मोर्चेबांधणी... https://t.co/8jIybRXcLt
— Sarkarnama (@SarkarnamaNews) February 20, 2021
राऊत म्हणाले की माझ्या ज्ञानानुसार, ज्यावेळी कलाम यांना राष्ट्रपतीपदाचे उमेदवार करण्याची प्रक्रिया सुरू होती, तेव्हा मोदी हे राष्ट्रीय राजकारणात नव्हते. आमचं ज्ञान कमी असेल, पण पाटील यांच्या अशा व्यक्तव्यांमुळे त्यांचेच हसं होत आहे. कलाम हे मुस्लिम होते म्हणून नव्हे तर ते संशोधक होते म्हणून त्यांना संधी दिली होती.
हेही वाचा : मलईदार विषयात काँग्रेस, शिवसेनेची युती कशी होते...शेलारांचा टोला
मुंबई : भाजपचे नेते आशिष शेलार यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. समुद्राचे पाणी गोड करण्याच्या प्रस्तावावरून शेलारांनी शिवसेनेची खिल्ली उडविली आहे. याबाबत शेलार यांनी टि्वट केले आहे.
आपल्या टि्वटमध्ये शेलार म्हणतात की समुद्राचे पाणी गोडे करण्यासारखे मोठे प्रस्ताव आले की शिवसेनेसोबत मिलीभगत कशी होते ? नालेसफाई, एसटीपी पासून मलईदार विषयात काँग्रेस, शिवसेनेची युती कशी होते? उजेडात सुरु असलेल्या या तुमच्या काँग्रेसी "रवीराज"चे सत्यशोधन आता आम्ही करु जनतेसमोर ! “नाचता येईना अंगण वाकडे”
आशिष शेलार म्हणाले, "गेल्या महापालिका निवडणुकीत मुंबईत भाजपाला वाँर्ड रचनेमुळे मोठे यश मिळाले, असा जावई शोध चार वर्षांनी काँग्रेसच्या सत्यशोधन समितीने लावला? सत्यच शोधायचे तर मग
40 नगरसेवक असताना महापालिकेत विरोधीपक्ष नेतेपद कसे मिळाले? सरकारमध्ये मांडीला-मांडी लावून आणि पालिकेत विरोधात कसे?

