...अन्‌ खासदार गिरीश बापटांनी लावला मंत्री वडेट्टीवार यांना फोन

त्यामुळे वेळेत निधी मिळाला नाही.
MP Bapat phone call to Minister Vadettiwar for seek compensation in Khed
MP Bapat phone call to Minister Vadettiwar for seek compensation in Khed

पुणे : निसर्ग चक्रीवादळमुळे (Hurricane) गेल्या वर्षी नुकसान झालेल्या पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील (Khed taluka) अनेक गावांतील नुकसानग्रस्त नागरीकांना अद्याप नुकसान भरपाई मिळालेली नाही. अनेकवेळा येथील नागरिकांनी मागणी प्रयत्न करूनही भरपाई मिळाली नाही. त्यासाठी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) यांच्याशी फोनद्वारे संपर्क साधून निधी उपलब्ध करून देण्याची मागणी खासदार गिरीश बापट (MP Girish Bapat) यांनी केली आहे, अशी माहिती पुणे जिल्हा परिषदेतील भारतीय जनता पक्षाचे गटनेते शरद बुट्टे पाटील (Sharad Butte Patil) यांनी दिली. (MP Bapat phone call to Minister Vadettiwar for seek compensation in Khed)

गेल्या वर्षी राज्यात निसर्ग चक्रीवादळ आले होते. त्या वेळी मुंबईसह कोकणात मोठे नुकसान झाले होते. तसेच, पुणे जिल्ह्याल मुळशी, भोर, वेल्हे, खेड आदी तालुक्यांतही मोठ्या प्रमाणात घरांची पडझड झाली होती. तसेच, झाडे उन्मळून पडले होते. त्याबाबतचे पंचानामे करून मदतीसाठी प्रस्ताव सरकारला पाठविण्यात आला होता. मात्र, सरकारकडून गेल्या वर्षीच्या चक्री वादळात झालेल्या नुकसानीची भरपाई खेड तालुक्यातील शेतकऱ्यांना अद्याप मिळालेली नाही, असे बुट्टे पाटील यांनी सांगितले.

गेल्या वर्षीच्या निसर्ग चक्रीवादळाने झालेली नुकसान भरपाई मिळावा, यासाठी आज (ता. १९ मे) जिल्हाधिकारी कार्यालयात खासदार गिरीश बापट यांची मदत घेऊन पाठपुरावा केला. खासदार बापट यांनी आपत्ती व्यवस्थापन विभागातील अधिकाऱ्यांना बोलवून मदतीबाबतची सद्यस्थितीची माहिती करून घेतली. 
  
त्या वेळी निवासी जिल्हाधिकारी यांनी सांगितले की, गेल्या वर्षीच्या चक्री वादळात झालेल्या नुकसानीच्या भरपाईसाठी खेड तहसीलदार यांनी पहिल्या टप्प्यात मागणी न करता दुसऱ्या टप्प्यात मागणी केली होती. त्यामुळे वेळेत निधी मिळाला नाही. जवळपास ४ कोटी रूपये तीन वेळा मागणी करूनही आले नाहीत. 

सध्या निधी मागणीचा हा प्रस्ताव मदत व पुनर्वसन विभागाकडे प्रलंबित असल्याची माहितीही या वेळी मिळाली. त्यानंतर खासदार बापट यांनी मदत व पुनर्वसन विभागाचे मंत्री विजय वडेट्टीवार यांना फोन करून खेड तालुक्यातील वर्षापूर्वीचे नुकसान आहे. भरपाई द्यायला उशीर झाला आहे. प्रस्ताव तुमच्या विभागात प्रलंबित आहे. तातडीने निधी उपलब्ध करून द्यावा, अशी विनंती केली. त्यामुळे आता  लवकरच निधी उपलब्ध होईल, अशी अपेक्षा आहे, असे भाजपचे गटनेते शरद बुट्टे पाटील यांनी नमूद केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com