राष्ट्रवादीच्या खासदारांनी घेतली नितीन गडकरींची भेट

वाहतूक कोंडीत अडकलेल्या तळेगाव-शिक्रापूर या ५४ किलोमीटरच्या महामार्गाची त्यातून आता सुटका होणार आहे.
Sarkarnama Banner - 2021-07-29T082713.391.jpg
Sarkarnama Banner - 2021-07-29T082713.391.jpg

पिंपरी:गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पुणे जिल्ह्यातील तळेगाव-चाकण-शिक्रापूर या महामार्गाच्या  चौपदरीकरणासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने १०१५ कोटींचा निधी मंजूर केला आहे. यामुळे वाहतूक कोंडीत अडकलेल्या तळेगाव-शिक्रापूर या ५४ किलोमीटरच्या महामार्गाची त्यातून आता सुटका होणार आहे. 

या कामाची निविदा प्रक्रिया व तांत्रिक बाबींची पूर्तता लवकरात लवकर पूर्ण करुन नोव्हेंबर अखेरपर्यंत प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल,अशी माहिती शिरूरचे राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे Amol Kolhe यांनी दिली. आमच्या सामुहीक प्रयत्नांचे हे यश असल्याचे डॉ. कोल्हे आणि मावळचे राष्ट्रवादीचेच आमदार सुनील शेळके यांनी सांगितले. या कामाला मंजुरी दिल्याबद्दल केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी Nitin Gadkari यांची खासदार कोल्हे यांनी मंगळवारी दिल्लीत प्रत्यक्ष भेट घेतली. त्यांना पुष्पगुच्छ देत धन्यवाद दिले. 

तळेगाव - शिक्रापूर रस्ता रुंदीकरणासाठी खासदार कोल्हे  व आमदार  शेळके यांच्या पाठपुराव्यातून अनेक बैठका झाल्या. तळेगाव शहरात असणारी जागेची अडचण लक्षात घेऊन बाह्यवळणासाठी पीएमआरडीए, एमएसआरडीसी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व सार्वजनिक बांधकाम (नॅशनल हायवे विभाग) यांचीही बैठक झाली. यात अनेक पर्यायांवर चर्चा झाल्यानंतर चौपदरीकरणाचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार खासदार डॉ. कोल्हे यांनी केंद्रीयमंत्री गडकरींशी पत्रव्यवहार केला. 

त्याला प्रतिसाद देत सुरुवातीला गडकरींनी तीनशे कोटी रुपये तळेगाव- चाकण रस्त्याला मंजूर केले होते. मात्र शिक्रापूरपर्यत पूर्ण रस्त्याचे रुंदीकरण आवश्यक असल्याने तळेगाव - चाकण - शिक्रापूर या रस्त्याच्या कामाचा प्रस्ताव विचाराधीन होता. त्यासंदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्व संबंधितांची बैठक घेतली. बैठकीला कोल्हे,आमदार दिलीप  मोहिते पाटील, आमदार शेळके व आमदार अशोक पवार व विविध अधिकारी उपस्थित होते. यात उपमुख्यमंत्र्यांनी तळेगाव - शिक्रापूर रस्ता रुंदीकरणाचे आदेश दिले होते. त्यानुसार केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने या रस्त्याला १०१५ कोटी रकमेच्या कामाला प्राथमिक मंजुरी दिली. 

यासंदर्भात डॉ. कोल्हे म्हणाले की, मतदारसंघातील राष्ट्रीय महामार्गांची रखडलेली कामे मार्गी लावणे ही तातडीची गरज होती. त्यामुळे नियोजनबद्ध पद्धतीने प्रयत्न करुन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम (नॅशनल हायवे विभाग) तसेच प्रसंगी पीएमआरडीए, एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांशी समन्वय साधून पर्याय शोधण्यासाठी प्रयत्न केले. या प्रयत्नांना आ.शेळके व मोहिते  यांनी दिलेली साथ यामुळे तळेगाव-शिक्रापूर रस्त्याचे रुंदीकरणाचे काम मंजूर होऊ शकले. उपमुख्यमंत्री अजितदादांचा पुढाकार व केंद्रीयमंत्री गडकरी यांनी दिलेला प्रतिसाद अशा एकत्रित प्रयत्नांमुळे हे काम मार्गी लागत आहे, हे महत्त्वाचे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com