या मोहिते पाटलांनी मागितली शरद पवारांकडे आमदारकी

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेतून राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये दाखल झालेले धवलसिंह मोहिते पाटील यांनी पक्षाकडे विधान परिषदेवर काम करण्याची संधी मिळावी, अशी मागणी केली आहे. त्यासाठी त्यांनी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना साकडे घातले आहे.
This Mohite Patil demands Sharad Pawar for MLA
This Mohite Patil demands Sharad Pawar for MLA

इंदापूर : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेतून राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये दाखल झालेले धवलसिंह मोहिते पाटील यांनी पक्षाकडे विधान परिषदेवर काम करण्याची संधी मिळावी, अशी मागणी केली आहे. त्यासाठी त्यांनी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना साकडे घातले आहे. 

लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत विजयसिंह मोहिते पाटील, रणजितसिंह मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादीपासून फारकत घेत भारतीय जनता पक्षाचा झेंडा हाती घेतला. त्यामुळे राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून बालेकिल्ला असलेल्या माळशिरस तालुक्‍यात पक्षाकडे नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली होती. सोलापूर जिल्ह्यातील बडी असामी राष्ट्रवादी सोडून गेल्याने पक्ष कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता होती. 

त्या वेळी शिवसेनेत कार्यरत असणारे धवलसिंह मोहिते पाटील यांनी थेट शरद पवार यांची भेट घेत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी त्यांनी पक्षाने आदेश दिल्यास माढा मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढविण्याची तयारी दाखवली होती. मात्र, त्या वेळी पवारांनी सोलापूर जिल्हा परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष आणि सध्याचे करमाळ्याचे आमदार संजय शिंदे यांना माढ्यातून लोकसभेला उतरविले होते. 

लोकसभा निवडणूक आणि त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीत पक्षाने दिलेल्या उमेदवाराचा धवलसिंह मोहिते पाटील यांनी मोठ्या हिरारीने प्रचार केला होता. विधानसभेला पक्षाचे उमेदवार उत्तम जानकर यांचा  थोडक्‍या मतांनी पराभव झाला होता. 

प्रतापसिंह मोहिते पाटील यांनी मोठे बंधू विजयदादांच्या विरोधात जात भाजपत प्रवेश केला होता. भाजपकडून ते राज्यमंत्रीही झाले होते. वडिलांनी घालून वाटेवरून वाटचाल करीत धवलसिंह हे राजकारण करत आहेत. सध्या ते राष्ट्रवादीचे काम करीत आहेत. पक्षकार्य विचारात घेऊन आपल्याला विधान परिषदेची उमेदवारी मिळावी, अशी मागणी त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे केली आहे. 

माझे वडील तथा माजी खासदार (कै.) प्रतापसिंह मोहिते पाटील यांनी सर्वसामान्य व्यक्ती विकासाचा केंद्रबिंदू मानून काम करण्यास प्राधान्य दिले. त्यांचे सर्वांगिण विकासाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, तसेच सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून विधान परिषदेवर संधी दिल्यास त्याचे सोनं केल्याशिवाय राहणार नाही, अशी ग्वाही धवलसिंह मोहिते पाटील यांनी दिली आहे. 

ते म्हणणात की, देशाची अर्थव्यवस्था शेती तसेच शेतीपूरक व्यवसायावर अवलंबून असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक न्याय द्यायचा आहे. त्यामुळे मी विधान परिषदेसाठी इच्छुक आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाने दिलेल्या उमेदवाराचा आपण प्रामाणिकपणे प्रचार केला. त्यावेळी अजित पवार यांनी दिलेला आदेश आम्ही शिरसावंद्य मानून काम केले. त्यामुळे पक्षाने आता संधी द्यावी. 

Edited By : Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com