पूजाचा मोबाईल व लॅपटाॅप भाजप नगरसेवकाने चोरला : पोलिसांकडे तक्रार

पूजा चव्हाण प्रकरणात रोज नवीन घडामोडी
dhanraj ghogare
dhanraj ghogare

बीड : टिकटाॅक स्टार पूजा चव्हाण हिच्या मृत्यूप्रकरणात रोज नवीन घडामोडी घडत आहेत. पूजाच्या आईवडिलांनी शांताबाई राठोड या कथित नातेवाईकाच्या विरोधात तक्रार केली. त्याविरोधात शांताबाई यांनी आपल्याला चव्हाण कुटुंबियांकडून जिवाचा धोका असल्याची तक्रार दिली. त्याच्यापुढे आता बंजारा समाजाची बदनामी केल्याबद्दल भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांच्याविरोधात शिवसेना उतरली असून बीड जिल्हाप्रमुख संगिता चव्हाण यांनी केला आहे.

संगिता चव्हाण या एवढ्यावरच थांबल्या नसून पूजा चव्हाण हिचा मोबाईल व लॅपटाॅप हा भाजपचे पुण्यातील नगरसेवक धनराज घोगरे यांनी चोरला असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पूजा चव्हाण हिचा पुण्यातील वानवडी परिसरातील इमारतीवून पडून मृत्यू झाला. घोगरे याच भागातील भाजपचे नगरसेवक आहेत.  

संगिता चव्हाण याबाबत म्हणाल्या की  पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणावरून,चित्रा वाघ यांनी बंजारा समाजाची बदनामी होईल, असं वक्तव्य अनेक वेळा केले आहे. त्यामुळं बंजारा समाजाची नाहक बदनामी झाली.  पूजाच्या मृत्यूनंतर भाजपचे नगरसेवक धनराज घोगरे यांनी, पूजाचा मोबाईल आणि लॅपटॉप चोरला आहे. त्या लॅपटॉप आणि मोबाईलमधील फोटो हे स्वतःच्या स्वार्थासाठी चित्रा वाघ आणि धनराज घोगरे मीडियाला देत आहेत. त्यामुळे तात्काळ दोघांवर गुन्हा दाखल करावा.  बीडच्या शिवाजीनगर पोलिस ठाण्यात ही तक्रार देण्यात आली आहे.

याबाबत घोगरे यांची बाजू समजून घेण्यासाठी त्यांना वारंवार दूरध्वनी केला असता त्यांनी त्यास प्रतिसाद दिला नाही. त्यांची बाजू कळताच ती बातमीत समाविष्ट करण्यात येईल.

पूजा चव्हाण प्रकरणात वनमंत्री संजय राठोड यांनी राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे दिला असून तो राजीनामा अद्याप राज्यपालांकडे दिला नसल्याबद्दल भाजपने यावर टीका केली. या प्रकरणात पोलिसांनी काहीच तपास केल्या नसल्याबद्दलही भाजप सरकारला लक्ष्य करत आहे. विधीमंडळाच्या अधिवेशनात हा मुद्दा गाजत आहे. पूजा चव्हाणच्या घरच्यांना संजय राठोड यांनी पाच कोटी रुपये दिल्याचा आरोप शांताबाई राठोड यांनी करून खळबळ उडवून दिली होती. दुसरीकडे आमच्या मुलीची बदनामी होत असून शांताबाईंशी आपला संबंध नसल्याचे वेळोवेळी स्पष्ट केले.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com