मनसेच्या रूपाली पाटील, डॉ. कोकाटे यांचा प्रभाव दिसलाच नाही 

या निवडणुकीत या दोघांनीही प्रचारात आघाडी घेतली होती.
MNS's Rupali Patil, Dr. shrimant Kokate's influence was not seen
MNS's Rupali Patil, Dr. shrimant Kokate's influence was not seen

पुणे : महाविकास आघाडीचा फार्म्युला यशस्वी झाल्याने पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत भारतीय जनता पक्षासह कुणाचाच टिकाव लागू शकला नाही. पहिल्या पसंतीची मते मला जरी कमी मिळाली असली तरी दुसऱ्या पसंतीची सुमारे 75 ते 80 हजार मते मला मिळाली आहेत, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुणे पदवीधर मतदारसंघातील उमेदवार रूपाली पाटील यांनी व्यक्त केले. किमान 50 हजार मते मिळतील, अशी अपेक्षा होती. अपक्ष म्हणून उभा असल्याने अनेक मर्यादा होत्या, तरीही सक्षमपणे लढण्याचा प्रयत्न केला, अशी भूमिका डॉ. श्रीमंत कोकाटे यांनी मांडली. 

पुणे पदवीधर मतदारसंघातून मनसेकडून रूपाली पाटील, तर अपक्ष म्हणून डॉ. कोकाटे यांनी निवडणूक लढविली. या निवडणुकीत या दोघांनीही प्रचारात आघाडी घेतली होती. या संदर्भात बोलताना डॉ. कोकाटे म्हणाले, "मी स्वत: एक लाख 23 हजार पदवीधर मतदारांची नोंदणी केली होती. मला किमान 50 हजार मते मिळतील, असा अंदाज होता. त्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून पाचही जिल्ह्यात संपर्क आणि नोंदणी करीत होतो. भारतीय जनता पक्षाचे उमेदवार संग्राम देशमुख व महाविकास आघाडीचे उमेदवार अरूण लाड यांच्यातील मतविभागणीत आपण निवडून येऊ, असे वाटत होते. मात्र, महाविकास आघाडी एकवटून लढल्याने अरूण लाड मोठ्या मताधिक्‍क्‍याने निवडून आले.'' 

रूपाली पाटील म्हणाल्या, "या निवडणुकीत पहिल्यांदाच मतांचा कोटा पार करून उमेदवाराने निवडणूक जिंकली आहे. अरूण लाड यांना मिळालेली मते अनपेक्षित आहेत. सातारा, सांगली व कोल्हापुरातून लाड यांना भक्कम पाठिंबा मिळाला. परिणामी त्यांना कोटा पूर्ण करता आला. महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी लाड यांना मनापासून मदत केली. भारतीय जनता पक्षाला चेकमेट देण्यासाठी या तीनही पक्षांनी एकत्रितपणे काम केले. त्याचा फायदा त्यांना झाला.'' 

डॉ. कोकाटे व रूपाली पाटील हे या निवडणुकीत चर्चेतील उमेदवार होते. या दोन उमेदवारांमुळे लाड अडचणीत येतील. त्यांची मते घटतील, अशी अटकळ मांडण्यात येत होती. मात्र, प्रत्यक्षात या दोघांना 13 हजार मतांच्या पुढे जाता आले नाही. सर्वांचा अंदाज चुकवत लाड यांनी विक्रमी मते मिळवत पुणे पदवीधर मतदारसंघावर आपले नाव कोरले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com