'वारे गुरुजी, तुम्ही राजीनामा मागे घ्या..' मी मुख्यमंत्र्यांना भेटतो!

शाळेच्या कामात राजकारण करणे हे पाप आहे.
Sarkarnama Banner - 2021-07-28T153113.091.jpg
Sarkarnama Banner - 2021-07-28T153113.091.jpg

शिक्रापूर : गेल्या काही दिवसांपासून वाबळेवाडी शाळेबाबत वाद निर्माण झाला आहे. शाळा प्रवेशावरुन सुरू झालेल्या वादानंतर मुख्याध्यापक दत्तात्रय वारे, जयसिंग न-हे व एकनाथ खैरे या शिक्षकांनी राजीनामे दिले आहेत. दोन दिवसांपूर्वी भाजपचे आमदार सुरेश धस यांनी या शाळेबाबत सोशल मीडियावर आपली भूमिका मांडली होती. सुरेश धस यांनी वाबळेवाडी (ता.शिरूर, जि. पुणे) शाळेला भेट दिली. 

भाजप नगरसेवकांनी पूरग्रस्तांसाठी दिले एक महिन्याचे मानधन
''आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शिक्षणासाठी दहा वर्षे कष्ट करुन शाळा उभारली. मात्र, कुणी तांत्रिक गोष्टींमुळे चिखलफेक करीत असेल तर वारे गुरुजी, वाबळेवाडी ग्रामस्थ व पालक यांच्या पाठीमागे मी ठाम उभा आहे. या शाळेबाबत मी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शिक्षणमंत्री, राज्याचे मुख्य सचिव आणि विरोधी पक्षनेते यांची भेट घेणार आहे," असे धस म्हणाले. ''वारे गुरुजींचा राजीनामा कोण स्वीकारतोय तेच पाहतो, वारे गुरुजी तुम्ही राजीनामा मागे घ्या,'' असेही धस यांनी यावेळी सांगितले. 

आमदारांवरील खटला मागे घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार
धस म्हणाले, ''फडणवीस सरकारच्या काळात या शाळेला आंतरराष्ट्रीय दर्जा मिळाला. पुढे राज्याच्या अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या शाळेच्या धर्तीवर १५०० शाळा राज्यात  सुरू करण्याचे अर्थसंकल्पात जाहीर केले. आता शाळेच्या कामात राजकारण करणे हे पाप आहे.''  

धस म्हणाले, ''फडणवीस सरकारच्या काळात या शाळेला आंतरराष्ट्रीय दर्जा मिळाला. पुढे राज्याच्या अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या शाळेच्या धर्तीवर १५०० शाळा राज्यात  सुरू करण्याचे अर्थसंकल्पात जाहीर केले. आता शाळेच्या कामात राजकारण करणे हे पाप आहे.''  

शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सुरेखा सचिन वाबळे यांनी शाळेवर २०१२ पासून होत असलेले अनियमिततेचे आरोपाबाबत माहिती दिली. शाळेसाठी दिलेल्या जमिनी, उभ्या राहिलेल्या इमारती आणि गावकऱ्यांची लोकवर्गणी याबद्दल सतीश वाबळे व केशवराव वाबळे यांनी माहिती दिली. धस यांनी सुमारे तीन तास शाळा व्यवस्थापन, पालक, ग्रामस्थांशी संवाद साधला.

यावेळी शिक्रापूरचे सरपंच रमेश गडदे, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश वाबळे, कृष्णा सासवडे, माजी सरपंच केशवराव वाबळे, यात्रा कमेटी अध्यक्ष अंकुश वाबळे आदींसह सर्व आजी-माजी ग्रामस्थ उपस्थित होते. 

हे शाळेसाठी भूषणावह
उद्योगपतींची मुले या शाळेत असल्याची माहिती सुरेश धस यांना देण्यात आली. याबाबत धस म्हणाले की, ग्रामस्थांनो, ही बाब शाळेचा गौरव वाढविणारी आहे. कारण श्रीमंत पालक त्यांची मुले आंतरराष्ट्रीय शाळेत पाठवितात. पण त्यांनी याचा विचार न करता वाबळेवाडी शाळेचा आणि पर्यायाने एका जिल्हा परिषद भागशाळेचा विचार केला, हे शाळेसाठी भूषणावह आहे. 

बहुभाषिक मुले
मुलांशी संवाद साधताना धस यांनी येथील विद्यार्थ्यांचे बहुभाषिकत्वाचा अनुभव घेतला. अंगणवाडीतील मुलांकडून जपानी भाषा ऐकून धस यांनी आश्चर्य व्यक्त केले. यावेळी तेलगु, गुजराथी, जपानी, फ्रेंच, स्पॅनिश भाषांमधील विद्यार्थ्यांची तयारी पाहून ''आता हे सर्व विधान परिषदेत मांडणार'' असल्याचे त्यांनी सांगितले.
Edited by : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com