चंद्रकांत पाटलांनी ब्राह्मण समाजाचा चुकीचा उल्लेख केलाच नाही : आमदार टिळकांचा दावा

भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ब्राह्मण समाजाबाबत काहीही उल्लेख केला नसल्याचा दावा पुण्यातील कसबा मतदार संघाच्या आमदार मुक्ता टिळक यांनी केला आहे.
sar13.jpg
sar13.jpg

पुणे : भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ब्राह्मण समाजाबाबत काहीही उल्लेख केला नसल्याचा दावा पुण्यातील कसबा मतदार संघाच्या आमदार मुक्ता टिळक यांनी केला आहे. या संदर्भातील निवेदन त्यांना प्रसिद्धीस दिले आहे.

गुरूवारी सिंधूदुर्ग येथे झालेल्या भव्य शेतकरी मेळाव्यात बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील नेमके काय बोलले याचा नीट अभ्यास करावा आणि मग पाटील यांच्या विरुद्ध आंदोलन करावे, असा सल्ला आमदार टिळक यांनी दिला आहे. पाटील आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुस्लिम समाजाला देशाच्या मुख्य प्रवाहात कसे सामावून घेतले याचा उल्लेख करताना वस्तुस्थिती मांडली. ते म्हणाले "" आताचे मुसलमान हे काही बाबराचे वंशज नाहीत बाबर आला आणि गेला. आपल्याकडे ही दाते, गाडगीळ अशी आडनावे असलेले मुस्लिम आहेत ते मूळचे इथलेच. कुणीतरी आक्रमक आला आणि ते धर्मांतरित झाले असा पाटील यांच्या वक्तव्याचा अर्थ आहे. मात्र, त्यांच्या बोलण्याचा चुकीचा अन्वयार्थ काढायचा आणि निरर्थक वाद निर्माण करायचा याला एका सुनियोजित षडयंत्राचा वास येतो आहे.''

चंद्रकांत पाटील जे म्हणाले तो इतिहास असून या देशात आलेल्या परकीय आक्रमकांनी मोठ्या प्रमाणावर धर्मांतर घडविले व सध्याचे मुस्लिम बांधव हे त्यांचेच वंशज आहेत म्हणून अद्यापही आपल्याकडे इतर समाजातील अनेक तत्सम आडनावे मुस्लिम समाजात आढळतात असा त्यांच्या वक्तव्याचा साधा सरळ अर्थ आहे. मात्र, या विषयाचे भांडवल करुन ब्राह्मण समाजाच्या मनात द्वेष पसरविण्याचा प्रकार निषेधार्ह असल्याचे आमदार टिळक यांनी म्हटले आहे. संबंधितांनी हा प्रकार थांबवावा असे आवाहन आमदार टिळक यांनी केले आहे.

पाटील यांच्या वक्‍तव्यानंतर पुण्यात त्याची प्रतिक्रिया उमटली ब्राम्हण समाजातील काही जणांनी पाटील यांच्या विरोधात आंदोलन करण्याचा पवित्रा घेतल्याने आमदार टिलक यांनी पत्रक काढून वस्तुस्थिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
Edited by : Umesh Ghongade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com