आमदार अशोक पवार, संजय जगताप ठेवणार चॅरिटी रुग्णालयांवर लक्ष...  - MLA Ashok Pawar, Sanjay Jagtap district level committee Charity Hospital | Politics Marathi News - Sarkarnama

आमदार अशोक पवार, संजय जगताप ठेवणार चॅरिटी रुग्णालयांवर लक्ष... 

जनार्दन दांडगे
बुधवार, 31 मार्च 2021

चॅरिटी रुग्णालयांच्या समितीवर आमदार अशोक पवार, आमदार संजय जगताप यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.

लोणी काळभोर (पुणे) : पुणे शहर व जिल्ह्यातील चॅरिटी (धर्मदाय) रुग्णालयात गरीब रुग्णांना मोफत उपचार मिळावेत,  व या योजनेची अंमलबजानणी योग्य रितीने व्हावी, यासाठी राज्य सरकारच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पाच जणांची जिल्हास्तरीय समिती बनविण्यात आली आहे. या समितीवर शिरुरचे आमदार अशोक पवार व पुरंदरचे आमदार संजय जगताप या दोघांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.

आमदार अशोक पवार हे राज्यस्तरीय विधानसभा आरोग्य समितीचे सदस्य म्हणून मागिल दीड वर्षापासून कार्यरत आहे. अशोक पवार यांची आता राज्यस्तरीय समिती बरोबरच जिल्हास्तरीय समितीवर सदस्य म्हणून नियुक्ती झाली आहे. आमदार अशोक पवार यांनी पहिल्या आमदारकीच्या काळात (२००९ ते १४) जिल्हास्तरीय समितीच्या माध्यमातून पुणे शहर व परिसरातील अनेक गरीब रुग्णांना चॅरिटी (धर्मदाय) रुग्णालयात मोफत उपचार मिळवून दिले होते. 

पुणे शहरात सुमारे ६० खासगी छोटी, मोठी आणि मध्यम स्वरूपांची चॅरिटी (धर्मदाय) रुग्णालये आहेत. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एकूण नफ्याच्या तुलनेत दोन टक्के रक्कम गरीब रुग्णांच्यावरील उपचारासाठी खर्च करण्याचे बंधन या रुग्नालयांवर आहे. मात्र अनेकदा रुग्णांलये अशा रुग्णांना दाखल करुन घेण्यास टाळाटाळ करतात. यावर निर्बंध यावेत यासाठी राज्यस्तरावर अदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली तर जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समित्या बनविण्यात आलेल्या आहेत. 

आमदार अशोक पवार म्हणाले, "राज्यभऱात 435 विविध पंचतारांकित धर्मादाय रुग्णालये आहेत. या रुग्णालयांमध्ये वार्षिक उत्पन्न ८५ हजार रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या व्यक्ती आणि वार्षिक उत्पन्न १ लाख ६० हजार पर्यंत उत्पन्न असलेल्या दुर्बल घटकातील व्यक्तींच्यावर मोफत उपचार करणे कायद्याने रुग्णालयांच्यावर बंधनकारक आहे. मात्र बहुतांश रुग्णालयात वरील प्रवर्गातील अनेक रुग्णांना बरेचदा रुग्णालयात दाखल करून घेतले जात नाही. याच घटकांच्यासाठी पुढील काळात काम करणार आहे."

अशी आहे समितीची रचना 

  1. जिल्हाधिकारी समितीचे अध्यक्ष, 
  2. पाच सदस्य (जिल्हातील दोन आमदार (लोकप्रतिनिधी), औंध रुग्णालयाचे जिल्हा चिकीत्सक, सहाय्यक धर्मादाय आयुक्त व निवासी उपजिल्हाधिकारी. 
  3. Edited  by :  Mangesh Mahale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख