राज्यमंत्री दत्तात्रेय भरणेंनी या कारणासाठी राजीनामा द्यावा : हर्षवर्धन पाटील 

लॉकडाउन काळातील वीजबील वसुलीचा फतवा राज्य सरकरने काढला आहे. तो फतवा अन्यायकारक आहे.
Minister of State Dattatreya Bharane should resign for this reason: Harshvardhan Patil
Minister of State Dattatreya Bharane should resign for this reason: Harshvardhan Patil

इंदापूर : शंभर टक्के वीजबिल माफी आणि संपूर्ण कर्जमाफी करू, मराठा व धनगर आरक्षणाचे प्रश्न सोडविण्याचे आश्वासन तालुक्‍याचे लोकप्रतिनिधी, राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी दिले होते. मात्र, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अजून भरपाई मिळाली नाही. त्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून भरणे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे नेते, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केली. 

लॉकडाऊन काळातील वीजबिल माफ न करता ते वसुलीचे आदेश देणाऱ्या महाविकास आघाडी सरकारचा वीजबिले जाळून इंदापुरात निषेध करण्यात आला आहे. त्या वेळी वीज वितरण कंपनी कार्यालयासमोर बोलतान पाटील यांनी भरणे यांच्या राजीनाम्याची मागणी केली. पाटील यांच्या हस्ते महावितरणचे उपअभियंता रघुनाथ गोफणे यांना निवेदन देण्यात आले. 

माजी सहकार मंत्री पाटील म्हणाले की, लॉकडाउन काळातील वीजबील वसुलीचा फतवा राज्य सरकरने काढला आहे. तो फतवा अन्यायकारक असून राज्यातील जनता व शेतकरी आर्थिकदृष्ट्या अडचणीत आहेत. त्यामुळे सरकारने हा फतवा त्वरित मागे घेऊन वीज बिलमाफीचा आदेश तत्काळ काढवा, अशी मागणीही पाटील यांनी केली. ऊर्जामंत्र्यांनी मीटर रीडिंगप्रमाणे आलेली वीज बिले माफ होणार नाहीत, अशी भूमिका घेतल्यानंतर वीज कंपनीने विजबिले वसुलीचा जनतेला तगादा लावला आहे. त्यामुळे सरकारने ग्राहक, उद्योजक व शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे, असा आरोपही पाटील यांनी राज्य सरकारवर केला. 

दरम्यान, तालुक्‍याचे लोकप्रतिनिधी दत्तात्रेय भरणे राज्यमंत्री मंडळात मंत्री असूनही प्रश्न सोडविण्यात त्यांना अपयश आले आहे. त्यामुळे त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणीही पाटील यांनी राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांचे नाव न घेता केली. 

या वेळी भाजपचे तालुकाध्यक्ष ऍड. शरद जामदार, शहराध्यक्ष शकील सय्यद, ऍड. कृष्णाजी यादव, विलास वाघमोडे, श्रीमंत ढोले यांची भाषणे झाली. लालासाहेब पवार, उदयसिंह पाटील, भरत शहा, मंगेश पाटील, सुभाष काळे, भास्कर गुरगुडे, गोरख शिंदे, देवराज जाधव, दादा पिसे आदी उपस्थित होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com