राज्यमंत्री भरणे - हर्षवर्धन पाटलांच्या समर्थकांमध्ये रंगला कलगीतुरा

ऐन नगरपरिषद निवडणुकीच्या तोंडावर मोठ्या राजकीय घडामोडी होण्याचे संकेत आहेत.
Minister of State Bharne-Harshvardhan Patil's supporters fight for credit
Minister of State Bharne-Harshvardhan Patil's supporters fight for credit

इंदापूर (जि. पुणे) : इंदापूर नगरपरिषद निवडणुकीचे पडघम वाजू लागताच राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे तसेच भारतीय जनता पक्षाचे नेते हर्षवर्धन पाटील यांचे काँग्रेसमध्ये असलेले समर्थक यांच्यामध्ये श्रेयवादावरून कलगीतुरा रंगला आहे. एकीकडे मंत्री भरणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी नगरपरिषद ताब्यात घेण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी दिला, तर दुसरीकडे हर्षवर्धन पाटील व त्यांचे समर्थक तथा नगराध्यक्षा अंकिता शहा, मुकुंद शहा व भरत शहा यांच्यातील शीतयुद्ध संपण्याची चिन्हे नाहीत, त्यामुळे ऐन नगरपरिषद निवडणुकीच्या तोंडावर मोठ्या राजकीय घडामोडी होण्याचे संकेत आहेत. (Minister of State Bharne-Harshvardhan Patil's supporters fight for credit)

इंदापूर शहर कसब्यातील विकास कामावरून नगरपरिषद सत्ताधारी गटनेते कैलास कदम व माजी उपनगराध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे नेते धनंजय बाब्रस यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. शहर कसब्यात नगरपरिषदेने केलेल्या कामाचे फुकटचे श्रेय राष्ट्रवादी काँग्रेस घेत आहे. माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नगराध्यक्षा अंकिता शहा यांनी जिल्हा नियोजन समितीकडे केलेल्या प्रयत्नांतून नगरसेविका मीना मोमीन व आपण स्वतः केलेल्या पाठपुराव्याने नागरी दलितेतर वस्त्यांमध्ये प्रभाग क्रमांक ६ मधील कामांसाठी सुमारे ६० लाखांचा निधी मंजूर करून आणला, असे कदम यांनी सांगितले.

महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत रामोशी गल्लीत विविध कामांसाठी ३४ लाख रुपयांचा निधी पाठपुरावा करून आणला. कामांच्या निविदा मंजूर असून काम सुरू करण्याचे आदेश देण्यापूर्वीच राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी या कामांचे फुकट श्रेय घेण्याच्या हेतूने उदघाटन केले आहे. राष्ट्रवादी नेत्यांनी केलेल्या कामांचे श्रेय नक्की घ्यावे, मात्र रडीचा डाव करू नये, असा आरोपही कैलास कदम यांनी केला.

कसब्यातील कामे राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे, राष्ट्रवादीचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी इंदापूर शहर विकासासाठी दिलेल्या ३० कोटी रूपयांतून सुरू आहे. माजी नगराध्यक्ष विठ्ठल ननवरे, सुरेश गवळी, वसंत मालुंजकर, प्रा. अशोक मखरे, दादासाहेब सोनवणे तसेच आपण स्वतः पाठपुरावा करून हा निधी मिळवला आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी विकासाच्या कामात खोटे बोलून जनतेची दिशाभूल करू नये. रामोशी गल्लीतील गटारी व रस्त्याचे भूमिपूजन दोन वर्षांपूर्वी झाले. मात्र, अद्याप काम झाले नाही. नगरपरिषदेच्या विकास कामांसाठी निधी मिळत नसल्याने गटनेते वैफल्यग्रस्त आहेत, त्यामुळे त्यांनी बाष्कळ बडबड करू नये, असा सल्ला धनंजय बाब्रस यांनी दिला. 

दम्यान, नगरपरिषद निवडणुकीसाठी राजकीय मोर्चेबांधणी सुरू झाली असून कोण कोणाचा राजकीय मित्र व शत्रू हे कळण्यास वेळ लागणार आहे. मात्र, सध्याच्या हालचाली पाहता ही निवडणूक चौरंगी होण्याची चिन्हे आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com