राज्यमंत्री भरणे, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष थोरातांनी घेतली दिल्लीत शरद पवारांची भेट

शरद पवार यांनी बॅंकेच्या संदर्भात अडचणी जाणून घेतल्या, असेही भरणे यांनी या वेळी सांगितले.
Minister of State Bharane, District Bank Chairman Thorat meet to Sharad Pawar in Delhi
Minister of State Bharane, District Bank Chairman Thorat meet to Sharad Pawar in Delhi

वालचंदनगर (जि. पुणे) : राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे आणि पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांनी आज (ता. ३ )  दिल्लीमध्ये जिल्हा व सहकारी बॅंकेच्या अडचणी संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. (Minister of State Bharane, District Bank Chairman Thorat meet to Sharad Pawar in Delhi)

या संदर्भात सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी सांगितले की, केंद्र सरकारच्या काही धोरणांचा फटका सहकारी बॅंकांना बसत आहे. बॅंकेच्या अडचणींसंदर्भातील माहिती शरद पवार यांना देण्यासाठी आज मंगळवारी (ता. ३) आम्ही दिल्लीत त्यांची भेट घेतली. शरद पवार यांनी बॅंकेच्या संदर्भात अडचणी जाणून घेतल्या, असेही भरणे यांनी या वेळी सांगितले. 

दत्तात्रेय भरणे हे राज्य मंत्रिमंडळात राज्यमंत्री असून पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे संचालक आहेत. तसेच, त्यांनी यापूर्वी बॅंकेचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. भरणे यांच्यासोबत बॅंकेचे विद्यमान अध्यक्ष रमेश थोरातही होते.   

या वेळी बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे, बारामती सहकारी बँकेचे संचालक इंद्रजित धुमाळ हेही उपस्थित होते.


पवारांनी अमित शहांकडे केल्या दोन महत्वाच्या मागण्या 
 
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांची दिल्लीत भेट घेतली. या भेटीमध्ये पवारांनी दोन महत्वाच्या मागण्या केल्या आहेत. केंद्र सरकारने सहकार खात्याची निर्मिती केल्यानंतर शहा यांच्याकडे या खात्याची जबाबदारी देण्यात आली. त्यानंतर पवारांनी पहिल्यांदाच शहा यांची भेट घेतली आहे.  

अमित शहा यांच्या भेटीवेळी शरद पवार यांच्यासोबत खासदार सुनिल तटकरे व राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगांवकर व प्रकाश नाईकनवरे उपस्थित होते. या बैठकीत संघाच्या वतीने शहा यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या मागण्यांबाबत शरद पवार यांनी ट्विटर हे निवेदन प्रसिध्द करत या भेटीची माहिती दिली आहे. 

साखर क्षेत्रातील सध्याची देशातील स्थिती आणि जादा साखर उत्पादनामुळं निर्माण झालेल्या समस्यांवर चर्चा झाल्याचे पवार यांनी म्हटलं आहे. साखरेचे किमान विक्री मूल्य (MSP) आणि साखर कारखान्यांमध्ये इथेनॉल निर्मिती प्रकल्पांची उभारणी करणे, हे दोन महत्वाचे मुद्दे शहा यांच्या निदर्शनास आणून दिल्याचेही पवारांनी म्हटले आहे. त्यांच्याकडून या मुद्यांचा विचार करून लवकर मार्ग काढला जाईल, अशी अपेक्षाही पवारांनी व्यक्त केली आहे. 

दरम्यान, या बैठकीनंतर शरद पवार आणि अमित शहा यांची स्वतंत्र भेट झाली. पंतप्रधान मोदी व शरद पवार यांची 17 जुलै रोजी भेट झाली होती. ही भेट सरकारी बँका व कोरोनाशी संबंधित मुद्यांवर झाल्याचा दावा राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केला होता. पण या भेटीने राज्यात खळबळ उडवून दिली होती. आता पंधरा दिवसांतच शरद पवार यांनी अमित शहांची भेट घेतली आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com