मिलींद म्हैसकर महसूल आणि वन विभागाचे प्रधान सचिव

औरंगाबादचे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांची मंत्रालयात मुख्य सचिवांच्या कार्यालयात उपसचिव म्हणून बदली करण्यात आली आहे.
मिलींद म्हैसकर महसूल आणि वन विभागाचे प्रधान सचिव

पुणे : मंत्रालयातील काही आधिकाऱ्यांच्या जबाबदारीत खांदेपालकट करण्यात आली आहे. म्हाडा मुंबईचे मुंबईचे मुख्य कार्यकारी आधिकारी मिलींद म्हैसकर यांची महसूल आणि वन विभागाचे प्रधान सचिव म्हणून बदली झाली आहे. 

तर अन्न व नागरी पुरवठा विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे यांची महाजनकोचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक म्हणून बदली करण्यात आली आहे. अतिरिक्त जिल्हाधिकारी के. ए.च बगाटे यांची शिर्डी संस्थानचे मुख्य कार्यकारी आधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. येत्या दोन दिवसात मंत्रालयातील आणखी काही आधिकाऱ्यांच्या बदल्या होण्याची शक्यता आहे.

औरंगाबादचे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांची मंत्रालयात मुख्य सचिवांच्या कार्यालयात उपसचिव म्हणून बदली करण्यात आली आहे. जलस्वराज्य अभियानाचे प्रकल्प व्यवस्थापक ए. ए. गुल्हाने यांची चंद्रपूरचे जिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे. अतिरिक्त जिल्हाधिकारी के. एच. बगाटे यांची शिर्डी संस्थानच्या मुख्य कार्यकारी आधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

 मंत्रालयातील तसेच राज्यातील विविध ठिकाणच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्या होणार आहेत. पुण्याचे जिल्हाधिकारी म्हणून पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी आधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे तात्पुरता चार्ज देण्यात आला असून पुण्यात पूर्ण वेळ जिल्हाधिकारी पदाची जबाबदारी आज किंवा उद्या जाहीर करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

आएएएस आधिकाऱ्यांच्या बदल्यांबरोबरच येत्या काही दिवसात पोलीस आधिकाऱ्यांच्या बदल्या होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. या बदल्यानंतर राज्यातील पोलीस आधिकाऱ्यांमध्ये मोठ्याप्रमाणात खांदेपालट होणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com