दादा...आता दुकाने उघडण्याची परवानगी द्याच!

दुकानदारांसोबतच कर्मचाऱ्यांच्याही तोंडचे पाणी पळालेआहे.
Merchant demands permission from Ajit Pawar to open shops in Baramati
Merchant demands permission from Ajit Pawar to open shops in Baramati

बारामती : दादा...गेल्या दोन महिन्यांपासून व्यापार थंडावलाय. दुकानदारांसोबतच कर्मचाऱ्यांच्याही तोंडचे पाणी पळाले असून आता दुकाने सुरु करायला परवानगी द्या, अशी आग्रही मागणी बारामती व्यापारी महासंघाच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आज (ता. २९ मे) करण्यात आली. (Merchant demands permission from Ajit Pawar to open shops in Baramati)

बारामतीत आज महासंघाच्या वतीने अध्यक्ष नरेंद्र गुजराथी यांनी उपमुख्यमंत्री पवार यांना निवेदन दिले. या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, गेल्या दोन महिन्यांपासून दुकाने व व्यवहार बंद आहेत. यामुळे कामगारांचा पगार, बँकेचे कर्जाचे हप्ते व व्याज, जागेचे भाडे, लाईट बिल, सर्व प्रकारचे कर, टेलिफोनचे भाडे  व्यापारी भरत आहेत. हा बोजा पडत असताना उत्पन्नाचे मार्ग मात्र बंद आहेत, त्या मुळे व्यापारी हवालदिल झाले आहेत. 

आगामी काळात हा बोजा सहन करण्याची व्यापाऱ्यांची शक्ती नाही, त्या मुळे व्यापार पुन्हा सुरु करण्याची परवानगी देण्यात यावी. बारामतीत कोरोना रुग्णांची संख्याही कमी होऊ लागली आहे, दोन महिने सरकारच्या ‘ब्रेक द चेन’ या मोहिमेला व्यापाऱ्यांनी सहकार्य केले आहे. या बाबींचा विचार करुन सरकारनेही आता व्यापाऱ्यांना व्यवहार सुरु करण्याची परवानगी देण्याची विनंती या निवेदनात करण्यात आली आहे. 

राज्य सरकार व स्थानिक प्रशासनाच्या वतीने जे नियम घालून दिले जातील, ते तंतोतंत पाळण्याची व्यापाऱ्यांची तयारी आहे. पण, आता दुकाने उघडण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी व्यापारी महासंघाच्या वतीने करण्यात आली आहे. 

बारामतीतील कोरोना रुग्णांची पॉझिटिव्हीटी टक्केवारी आता झपाट्याने कमी होऊ लागली आहे. त्यामुळे बारामतीचे जनजीवन पूर्ववत व्हावे, अशी बारामतीकरांचीही इच्छा आहे. निर्बंध शिथील करुन व्यापाऱ्यांना दुकाने उघडण्यास परवानगी देऊन दिलासा देण्याची मागणी जोर धरु लागली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com