आता 'या' आजाराच्या उपचारासाठी मेडिक्लेम करता येणार.. 

तुमचा कोरोना तपासणीचा अहवाल जर पॅाझिटिव्ह आला. तर तुम्हाला कोरोना उपचारासाठीही मेडिक्लेम पॅालिसीचा उपयोग होऊ शकतो.
Corona Positive
Corona Positive

पुणे : मेडिक्‍लेम पॉलिसी विमाधारकासाठी एक गुड न्यूज आहे. पॅालिसीधारकांना आता कोरोना उपचारासाठीही क्लेम करता येणार आहे. भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने याबाबतच्या  सूचना नुकत्याच दिल्या आहेत.  

तुमचा कोरोना तपासणीचा अहवाल जर  पॅाझिटिव्ह आला. तर तुम्हाला कोरोना उपचारासाठीही मेडिक्लेम पॅालिसीचा उपयोग होऊ शकतो. या आदेशामुळे कोरोनाबाधित मेडिक्लेम पॅालिसीधारकांना दिलासा मिळाला आहे. कोरोनाचा उपचार घेत असताना तुमचा जो खर्च झाला असेल त्याच्या परताव्यासाठी क्लेम करता येणार आहे, असे ग्राहक पंचायत न्यायप्राधिकरणाचे अध्यक्ष श्रीकांत जोशी यांनी स्पष्ट केले आहे.

कोरोना हा व्हायरल इन्फेशनमुळे होतो. "व्हायरल इन्फेक्‍शन' झाल्यास भरपाई देण्याची तरतूद मेडिक्‍लेम पॉलिसीमध्ये आहे.  त्यामुळे कोरोना उपचारात झालेल्या खर्चासाठी आता क्लेम करता येणार असल्याचे ग्राहक पंचायत न्यायप्राधिकरणाने म्हटले आहे. पॉलिसी काढलेल्या दिवसापासून तीस दिवसानंतर तुम्हाला कोरोनाची लागण झाली तरीही तुम्हाला उपचारासाठी आलेला खर्च परत मिळविता येईल. महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. राज्यात एक लाखांपेक्षा जास्त जण कोरोना बाधित आहेत. शनिवारी राज्यात 3 हजार 427 जणांचे कोरोना अहवार पॅाझिटिव्ह आले आहेत. तर शनिवारी 113 जणांना मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 3 हजार 830 झाली आहे.  

राज ठाकरे यांच्या वडिलांचे नाव श्रीकांत ठाकरे ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे धाकटे बंधू होते. प्रसिद्ध संगीतकार म्हणून श्रीकांत ठाकरे सर्वांच्या परिचयाचे होते. राज ठाकरे यांचे प्राथमिक शिक्षण दादर मधील बालमोहन विद्यालयात पूर्ण झाले. त्यांचे संपूर्ण बालपण दादर येथेच गेले. राज ठाकरे हे स्वतः उत्तम व्यंग्यचित्रकार आहेत. "जगाला हेवा वाटावा असा महाराष्ट्र घडवायचाय" असे ध्येय ते बाळगून आहेत.  राज हे उत्तम वक्ते आहेत. आपली मते ते स्पष्टपणे मांडतात.

त्यांच्या सगळ्याच सभा प्रचंड गर्दी खेचणाऱ्या असतात. ते स्वतः साहित्य, कला, संगीत यांचे उत्तम जाणकार आहेत.  शिवसेनेमध्ये आपल्याला व आपल्या समर्थकांना दुजाभावाची वागणूक मिळत असल्याचे सांगत जानेवारी २००६ मध्ये राज यांनी शिवसेना सोडली व ९ मार्च २००६ रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. राज ठाकरे यांनी मनसेची स्थापना केल्यानंतर मराठीचा मुद्दा उचलून धरला. त्यांनी मुंबईत व राज्यात येणाऱ्या परप्रांतिय व विशेषतः बिहार व उत्तर प्रदेशच्या लोकांना टिकेचे लक्ष्य केले. त्यामुळे राज व त्यांची मनसे यावर कायमच टिका होत राहिली.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com