विजय वडेट्टीवारांच्या तोंडाला काळे फासणा-याचा सत्कार करु!

कोल्हापूर येथील सकल मराठा समाजाने मंत्री वडेट्टीवार यांच्या तोंडाला काळे फासावे. असे करणा-याचा सत्कार केला जाईल अशी घोषणा सचिन तोडकर यांनी केली आहे.
Vijay Wadettiwar
Vijay Wadettiwar

कोल्हापूर : राज्याचे बहुजन कल्याण विकासमंत्री विजय वडेट्टीवार गेले काही दिवस सातत्याने मराठा संघटनांच्या रडावर राहिले आहेत. आता पुन्हा ते चर्चेत आले आहेत. येथील दसरा चौकात सकल मराठा समाजातर्फे आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन सुरु आहे. यावेळी सकल मराठा समाजाने मंत्री वडेट्टीवार यांच्या तोंडाला काळे फासावे. असे करणा-याचा सत्कार केला जाईल अशी घोषणा सचिन तोडकर यांनी केली आहे. 

कोल्हापूर येथे समस्त मराठा समाजातर्फे आरक्षणासाठी आंदोलन सुरु आहे. यावेळी मंत्री वडेट्टीवारांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्याचा देखील प्रयत्न झाला. यावेळी संघटनेचे कार्यकर्ते श्री. तोडकर यांनी मंत्री वडेट्टीवारांसदर्भात ही घोषणा केली. ते म्हणाले, वडेट्टीवार सातत्याने विविध विधाने करुन गोंधळ निर्माण करतात. त्यांचा रोख मराठा समाजाच्या आरक्षणाविरोधात आहे. त्यामुळे समाजात त्यांच्याविषयी नाराजी आहे. त्यामुळे त्यांच्या तोंडाला काळे फासले पाहिजे. जो कोणी असेल त्याचा सत्कार करुन मराठा भूषण पुरस्कार देऊन गौरव केला जाईल.  ते म्हणाले, जालना येथे इतर मागासवर्गीयांच्या विविध प्रश्नांवर मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी मंत्री वडेट्टीवार यांनी गायकवाड आयोगाचा अहवाल अहवाल विश्वासार्ह नाही, असे विधान केले होते. त्यामुळे मराठा समाजात त्याची तीव्र प्रतिक्रीया उमटली आहे. समाजात वडेट्टीवार यांच्या त्या विधानाने असंतोष असल्याचा दावा तोडकर यांनी यावेळी केला. 

यामुळे मराठा संघटनांची नाराजी
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासंदर्भात शासनाने गायकवाड आयोग स्थापन केला होता. या आयोगाने राज्यभरातील संदर्भ व माहिती संकलीत केली. त्यांनी विविध घटकांशी चर्चा केली. त्यानंतर शासनाला दिलेल्या अहवालात मराठा समाज मागास असल्याचे म्हटले होते. या आयोगाने संकलीत केलेले पुरावे व तपशील शाश्त्रीयदृष्ट्या व आरक्षणाच्या निकषांच्या कसोटीवर उतरणारा होता. हा अहवाल अचूक आहे. असे असतांना त्यावर आक्षेप घेण्यात आल्याने मराठा संघटनांत वडेट्टीवारांच्या त्या विधानाबाबत नाराजी आहे.   
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com