बांदलांचा पोलिस ठाण्यातील मुक्काम वाढला; आणखी एका प्रकरणात अटक

शिक्रापूर पोलिसांनी आज शिरूर न्यायालयातूनचत्यांना ताब्यात घेतले.
Mangaldas Bandal arrested in another fraud case
Mangaldas Bandal arrested in another fraud case

शिक्रापूर (जि. पुणे)  ः पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम समिती सभापती मंगलदास बांदल यांना आज (ता. २ जून) शिरुर न्यायालयाने दत्तात्रेय मांढरे फसवणूक प्रकरणात न्यायालयीन कोठडी सुनावली. मात्र, त्याचवेळी शिक्रापूर पोलिसांनी त्यांना पुण्यातील शिवाजीराव भोसले सहकारी बॅंकेच्या एका फसवणूक प्रकरणी दाखल गुन्ह्याच्या तपासासाठी पुन्हा अटक केली. (Mangaldas Bandal arrested in another fraud case)

दरम्यान, बांदल यांचे मित्र असलेले दत्तात्रेय मांढरे यांच्या व्यवहारातील दस्त कुलमुख्त्यारपत्रावरही आणखी दोन मित्रांनाच अडकविल्याचा प्रकार उघड झाला आहे.  बांदलांबरोबर अनेक दिवस मैत्री असलेले घोडगंगा सहकारी बॅंकेचे माजी संचालक रामहरी दौंडकर (रा. करंजावणे, ता. शिरूर) यांनाही अटक झाली. त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश कोर्टाने दिला आहे. 

सणसवाडी (ता. शिरूर) येथील पाणीचोरीच्या गुन्ह्यानंतर बांदल यांच्याविरोधात सध्या तक्रारींचा पाऊस पडत आहे. पाणीचोरीच्या गुन्ह्यात मंजूर अटकपूर्व जामीन मिळताच दत्तात्रेय मांढरे यांची बनावट दस्तऐवज व शिवाजीराव भोसले सहकरी बॅंकेच्या थकीत सव्वा कोटीच्या कर्जाच्या अनुषंगाने फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल झाला. या गुन्ह्यात त्यांना २६ मे रोजी अटक होता न्यायालयाने त्यांना १ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. 

दरम्यान एक दिवस आधीच म्हणजे ३१ जुलै रोजी मांढरे यांच्याच प्रकरणातील व्यवहारात केलेले कुलमुख्त्यारपत्रात बांदल यांनी मांढरेंऐवजी त्यांचे आणखी दोन मित्र रामहरी दौंडकर व एस. जे. सातपुते यांना मांढरे म्हणून उभे केल्याचे पुढे आले. त्याच रात्री दौंडकर व सातपुते यांना अटक करण्यात आली आणि १ तारखेला न्यायालयाने तिघांनाही एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. या तिघांचीही आज (ता. २ जून) पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना शिरुर न्यायालयात हजर करण्यात आले. त्या वेळी न्यायालयाने तिघांनाही न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. 

दरम्यान, याच वेळी शिक्रापूर पोलिसांनी बांदलांचा पुन्हा ताबा हवाय; म्हणून न्यायालयात अर्ज केला. कारण २२ मार्च रोजी मंदार पवार (रा. तळेगाव ढमढेरे) यांच्या तक्रारीनुसार शिक्रापुरातील कृष्णाजी ज्ञानोबा विरोळे यांनी शिवाजीराव भोसले सहकारी बॅंकेतून काढलेल्या १ कोटी ७५ लाखांच्या कर्जासाठी पवार यांचे बोगस पॅनकार्ड, आधारकार्ड, प्राप्तीकरण विवरण पत्र वापरले होते. त्यात विरोळे यांच्यावर गुन्हा दाखल असून ते फरारी आहेत. भोसले सहकारी बॅंकेनेच मंदार पवार यांच्या प्रकरणातही बांदल यांचा सहभाग असल्याची तक्रार शिक्रापूर पोलिसांकडे मंगळवारी (ता.१ जून) दाखल केल्याने बांदल यांना या नवीन फसवणुकीच्या गुन्ह्याच्या तपासासाठी शिक्रापूर पोलिसांनी आज शिरूर न्यायालयातूनच ताब्यात घेतले, अशी माहिती पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी दिली. 

बडी मंडळी पोलिसांच्या जाळ्यात अडकणार

शिवाजीराव भोसले सहकारी बॅंकेचा गैरव्यवहार, बॅंकेचे अध्यक्ष आमदार अनिल भोसलेंची अटक, जप्तीसत्र आणि बॅंकेचा परवानाच रद्द होणे, यामुळे बॅंकेतील अनेक आर्थिक कारनामे गाजत आहेत. याच पार्श्वभूमीवर बॅंकेकडून बांदलांवर दाखल तक्रारीवेळी त्यांनी बॅंक गैरव्यवहाराशी संबंधित शिक्रापुरातील अनेक खातेदारांची बॅंक स्टेटमेंट पोलिसांना दिल्याची खात्रिलायक माहिती आहे. ही स्टेटमेंट काय बोलतात, त्यात कोण-कोण कागदावर दिसणार, त्यांच्यावर शिक्रापूर पोलिस कारवाई करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे पुढील काही दिवसांत या प्रकरणी आणखी काही बडी मंडळी पोलिसांच्या जाळ्यात अडकण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com