पुण्यात लॉकडाउनची तयारी, पुणे पोलिस लागले कामाला, खरेदीसाठी झुंबड !

पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुण्यात पुन्हा लॉकडाऊन करण्यात येणार असल्याची घोषणा केली होती.
 पुण्यात लॉकडाउनची तयारी, पुणे पोलिस लागले कामाला, खरेदीसाठी झुंबड !

पुणे : पुणे शहरात लॉकडाऊन सोमवारी (ता. 13) रात्री बारापासून सुरू होणार असल्याने आज दिवसभर खरेदीसाठी पुणेकरांनी अनेक ठिकाणी गर्दी केली होती. पोलिसांनीही पूर्व तयारी म्हणून रस्ते बंद करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. पुणे, पिंपरी-चिंचवडसह काही भागात दहा दिवसासाठी लॉकडाऊन करण्यात येणार आहे. हे लॉकडाऊन अधिक कडक असेल असे समजते. 

पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुण्यात पुन्हा लॉकडाऊन करण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. कोरोनाबाधितांची वाढती संख्या विचारात घेऊन, पुणे शहर व परिसरात लॉकडाउन लागू करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले. नागरिकांनी पुरेशी तयारी करण्यासाठी वेळ मिळावा, यासाठी तीन दिवस म्हणजे शुक्रवारी प्रशासनाकडून ही घोषणा करण्यात आली.

त्यामुळे जीवनावश्‍यक वस्तूंसह विविध वस्तूंची खरेदी करण्यासाठी गेल्या दोन दिवसांपासून नागरिकांची धावपळ सुरू आहे. असे असताना पोलिसांना स्वत:च्या स्तरावर रविवार सकाळपासूनच लॉकडाउनची तयारी सुरू केली असल्याचे चित्र पहावयास मिळाले. 

शहराच्या अनेक भागातील गल्लीबोळ आज सकाळपासूनच बॅरीगेट आणि बांबू लावून बंद करण्यात आले. अनेक ठिकाणी रस्ते अडविण्यास सुरवात करण्यात आली. चौकशी केली असता, पोलिसांकडून आदेश असल्यामुळे हे बंद करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. 

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उद्या (ता. 13) रात्री 12 वाजल्यापासून पुन्हा लॉकडाउन लागू होणार आहे. त्यामुळे उद्या सकाळी नऊ ते सायंकाळी सात या वेळेत सर्वच दुकाने उघडी राहणार असल्यामुळे नागरिकांना खरेदी करता येणार आहे. मात्र मंगळवार सकाळपासून पुन्हा दुकाने बंद राहणार आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com