पिंपरी-चिंचवडला पुन्हा एकदा गतिशील करू या : अजित पवार - Let make Pimpri-Chinchwad dynamic once again   Ajit Pawar | Politics Marathi News - Sarkarnama

पिंपरी-चिंचवडला पुन्हा एकदा गतिशील करू या : अजित पवार

सरकारनामा ब्युरो
रविवार, 11 ऑक्टोबर 2020

पिंपरी-चिंचवडला पुन्हा एकदा विकासाच्या वाटेवर गतिशील करण्याचा आपण सर्व मिळून एकजुटीने प्रयत्न करूया.

पुणे : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या 38 व्या वर्धापनदिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवड शहराच्या निर्मितीचे शिल्पकार स्वर्गीय अण्णासाहेब मगर यांना अभिवादन केले. शहरवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शुभेच्छा संदेशात म्हणतात की स्वर्गीय अण्णासाहेब मगर यांच्या दूरदृष्टीतून, परिश्रमातून आकाराला आलेले हे शहर आज वेगाने विकसित होत आहे. राज्यातील आणि देशातील नागरिकांच्या पसंतीचे शहर ठरले आहे, याचा आपल्या सर्वांना आनंद आहे. या शहराच्या जडणघडणीत पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आजी माजी महापौर, आजी-माजी पदाधिकारी, अधिकारी-कर्मचारी आणि समस्त पिंपरी-चिंचवड शहरवासीयांचे योगदान असून त्यांच्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो व सर्वांना वर्धापनदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा देतो. 

देशातील सर्वाधिक वेगाने विकसित होणारे शहर असा लौकिक असलेल्या पिंपरी-चिंचवडला पुन्हा एकदा विकासाच्या वाटेवर गतिशील करण्याचा आपण सर्व मिळून एकजुटीने प्रयत्न करूया. सध्या संपूर्ण जग, देश, राज्याबरोबर पिंपरी-चिंचवड शहरवासीय मोठ्या निर्धाराने कोरोना संकटाचा मुकाबला करत आहेत. कोरोनाचे हे संकट दूर होईपर्यंत आपण सर्वांनी मिळून मास्क लावणे, सोशल डिस्टंसिंग पाहणे, हात स्वच्छ धुणे, घर -परिसर-शहर व वैयक्तिक स्वच्छतेची काळजी घेणे आवश्यक आहे. पिंपरी-चिंचवड शहरवासीयांनी कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करून लवकरात लवकर शहर कोरोनामुक्त करण्याचा निर्धार करुया, असे  
अजित पवार यांनी सांगितले.  

हेही वाचा : मुख्यमंत्री म्हणाले, "पुन्हा लॅाकडाउनची परिस्थिती आणू नका.."
 

मुंबई : राज्यात कोरोना हातपाय पसरवित आहे. त्याला थांबविण्याची गरज आहे. सर्वांनी आपली जबाबदारी ओळखून कोरोनाशी मुकाबला केला पाहिजे. 'माझे कुंटुब माझी जबाबदारी' मोहीमेला काही जण अल्पप्रतिसाद देत आहेत. कोरोना रोखण्यासाठी नियमावली पाळा, अन्यथा पुन्हा लॅाकडाउन करावे लागेल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सांगितले. कोरोनच्या रूग्णांची संख्या कमी होत असल्याने घाबरून जाण्याचे कारण नाही, असं कोणी समजू नये, असे मुख्यमंत्री म्हणाले. तुम्हाला मास्क हवा की पुन्हा लॅाकडाउन, असा प्रश्न मुख्यमंत्री ठाकरे यांनी आज राज्यातील जनतेला विचारला. ते म्हणाले की राज्यात सुमारे 15 लाख जण कोरोना बाधित होते, त्यातील सुमारे 12 लाख जण हे कोरोनामुक्त झाले आहेत. तर दुदैवाने 40 हजार जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सुमारे 2 लाख जण व्हेटिंलेटरवर आहेत. 70 ते 80 टक्के जणांना सैाम्य, मध्यम स्वरूपाची लक्षणे आहेत. कोरोनाशी लढणारे आरोग्य सेवक, महसुल विभाग, पोलिस यंत्रणा यांच्या कामगिरीचे मुख्यमंत्र्यांनी कैातुक केले. कोरोनाकाळात शिवभोजन थाळीचा लाभ 2 कोटी 2 लाख जणांना मिळाल्याचे त्यांनी सांगितले. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख