जेजुरी (पुणे) : राज्याचे कुलदैवत असलेल्या खंडेरायाची सोमवती यात्रा रद्द करण्यात आली आहे. (Khandoba Somvati Yatra) जेजुरी येथे शनिवार (ता.12) ते सोमवार (ता.14) या कालावधीत जमावबंदी (Curfew orders in Jejuri) आदेश लागू करण्यात आला आहे.
सोमवती अमावस्या (ता.14) असल्यामुळे व दोन दिवस (ता.12, व ता.13) सु्टीचा दिवस असल्याने श्री खंडोबा मंदिर व श्री कडेपठार मंदिर तसेच जेजूरी शहरात लाखो भाविक येत असतात. यामुळे जिल्हा प्रशासनाने जमाबबंदी आदेश लागू केला आहे.
सरकारी फतवा...जीन्स, टी-शर्ट घालण्यास सरकारी अधिकारी-कर्मचाऱ्यांना बंदी #Sarkarnama #MarathiNews #SarkarnamaNews #PoliticalNews #UddhavThackeray #DressCode #Government #Office #Maharashtra #Viral #ViralNews https://t.co/coWOU9h55J
— Sarkarnama (@SarkarnamaNews) December 11, 2020
कोरोनामुळे भाविकांच्या सुरक्षिततेसाठी हा निर्णय घेतला असल्याचे प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे. १२ ते १४ डिसेंबरपर्यंत जेजुरीत भाविकांना प्रवेश बंद आहे. भाविकांनी देवदर्शनासाठी जेजुरीत येऊ नये, प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
सोमवतीनिमित्त कऱ्हानदी स्नानासाठी खंडोबाची पालखी जेजुरी गडावरुन प्रस्थान करते. यावेळी मोठ्या प्रमाणात भंडाराची उधळण करण्यात येते. कोरोनामुळे हा पालखी सोहळा रद्द करण्यात आला आहे. जेजूरी गडावर राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण होणार आहे.
या कार्यक्रमाला मान्यवर व्यक्ती उपस्थित राहणार आहे. त्यामूळे जेजूरी येथे जमावबंदी आदेश लागू करण्याबाबत दैांड- पुरंदर उपविभागीय अधिकाऱ्यांनी या ठिकाणी जमावबंदी करण्याबाबत जिल्हा प्रशासनाला विनंती केली होती. जेजुरीतील पालखी सोहळाही रद्द करण्यात आला आहे. श्री खंडोबा मंदिर व श्री कडेपठार मंदिर तसेच जेजूरी शहरात उद्या (ता.12) रात्री 12 वाजण्यापासून ते सोमवारी(ता.14) रात्री बारा वाजेपर्यंत जमावबंदीचे आदेश प्रशासनाने दिले आहेत.
हेही वाचा : शेतकऱ्याच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका : शरद पवार
मुंबई : "कुठलीही चर्चा न करता कृषी कायदा घाई घाईने मंजूर करण्यात आला आहे. अन्यदात्याच्या सहनशीलतेचा अंत सरकारने पाहू नये," असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज मुंबईत पत्रकारांशी बोलतांना सांगितले. कृषी कायद्यावरून शरद पवार यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. शरद पवार म्हणाले, "केंद्रीय कृषी कायदा पाठीमागं घ्यावा लागेल, त्यातून तोडगा निघेल. कृषी कायदा लोकसभेत मंजूर करण्याची घाई केली, पंजाबमध्ये शेतकरी आंदोलन करीत आहेत. त्याचे लोन देशात सगळीकडे पसरेल का अशी भिती वाटते." आपण यूपीए अध्यक्ष होणार का या प्रश्नाला उत्तर देताना पवार म्हणाले की या बातम्या खोट्या आहेत. त्यात तथ्य नाही."

