स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा निता रजपूत यांचे पती जयवंत रजपूत यांची आत्महत्या

पुणे महापालिकेतील स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा निता रजपूत यांचे पती जयवंत लालसिंग रजपूत यांनी आत्महत्या केल्याचा प्रकार पुढे आला आहे.
परदेशी 29.jpg
परदेशी 29.jpg

पुणे : कॉंग्रेसच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या तसेच पुणे महापालिकेतील स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा निता रजपूत यांचे पती जयवंत लालसिंग रजपूत यांनी आत्महत्या केल्याचा प्रकार पुढे आला आहे. पुण्यातील विधी महाविद्यालय परिसरातील कार्यालयात त्यांनी आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास करण्यात येत आहे.


रजपूत यांच्या आत्महत्येमागे व्यावसायिक अडचण होती की अन्य काही कारण होते याचा तपास डेक्कन पोलिस करणार आहेत. विधी महाविद्यालय रस्ता परिसरातील कार्यालयात आज सकाळी त्यांचा मृतदेह आढळल्यानंतर डेक्कन पोलिसांना कळविण्यात आले. पोलिस घटनास्थळी आले असून पुढील कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. व्यावसायिक अडचणीतून आलेल्या तणावातून रजपूत यांनी आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत असले तरी आत्महत्येचे नेमके कारण काय असू शकते याचा तपास पोलिस करणार आहेत.

हेही वाचा : मनसेचे उपशहराध्यक्ष राकेश पाटील यांची धारधार शस्त्राने हत्या  

अंबरनाथ : अंबरनाथ मधील पाले गावात असलेल्या पटेल आर मार्ट या शॉपिंग मॉल बाहेर उभे असलेले अंबरनाथ शहराचे मनसेचे उपशहर अध्यक्ष राकेश पाटील यांच्यावर धारधार शस्त्राने हल्ला करण्यात आला. बुधवारी सांयकाळी हा हल्ला झाला. हल्ल्यात जखमी राकेश पाटील यांना रुग्णालयात उपचारार्थ घेऊन गेले असता त्यांचा मृत्यू झाला आहे. हा हल्ला सहा जणांनी केला असून ते दोन कार मधून आल्याचे प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे. हि हत्या व्यावसायिक वादातून झाल्याचे प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. हत्या झाल्याचे कळताच अंबरनाथ सहाययक पोलीस आयुक्त विनायक नराळे यांनी जवळील उल्हासनगर, बदलापूर, मुरबाड पोलिसांना अलर्ट केले आणि नाकाबंदी करण्यात आली आहे. दरम्यान  काही तासातच मुरबाड पोलिसांनी चार संशयित आरोपीना ताब्यात घेतले आहे. 

आता दोन आरोपींच्या शोध कामी पोलीस लागले आहेत. या घटनेने अंबरनाथ मधील पालेगाव परिसरात खळबळ माजली आहे. या प्रकरणी अंबरनाथ मधील शिवाजी नगर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून घडणाऱ्या जबरी चोऱ्या, घरफोड्यांच्या घटनांनी नागरीक अक्षरशः त्रस्त झाले. त्यातच राज्याच्या वेगवेगळ्या भागात खूनाच्या घटना वारंवार घडत आहेत. पुण्यात काही दिवसांपूर्वी एका राजकीय पदाधिकाऱ्याचा खून झाला. त्यानंतर दोन दिवसापूर्वी एकाच दिवशी घडलेल्या दोन घटनांमुळे शहराच्या सुरक्षा व्यवस्थेचे धिंडवडे निघाल्याची वस्तुस्थिती आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com