जयंत पाटलांनी ऐकली सरपंचाची कैफियत... कालवे दुरूस्तीचा आदेश..

टेमगिरे यांची कालवा दुरुस्तीची कैफियत जयंत पाटलांनीही ऐकून घेतली. आणि तीनही कालवे त्वरित दुरुस्ती करण्याचा आदेश त्यांनी दिला
jp.jpeg
jp.jpeg

शिक्रापूर : आपल्या गावच्या तीन कालवा वितरीकांच्या दुरुस्तीसाठी पुणे जिल्ह्यातील बुरुंजवाडी (ता. शिरूर) येथील सरपंच पुनम टेमगिरे यांचे पती दत्तात्रय टेमगिरे काल (ता.२५) थेट जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या दालनात पोहचले  राज्य उत्पादन शुल्कमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मतदार संघातील व त्यांचेच कट्टर कार्यकर्ते समजले जाणारे टेमगिरे यांची कालवा दुरुस्तीची कैफियत जयंत पाटलांनीही ऐकून घेतली. आणि तीनही कालवे त्वरित दुरुस्ती करण्याचा आदेश त्यांनी खात्याला दिला.
       

आपल्या पक्षाची सत्ता, आपले नेते राज्यात मंत्री, आपली छोटी-मोठी कामे होणार म्हणून सत्तेतील प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला अपेक्षा आणि आशा असते. याच आशेनं बुरुंजवाडी येथे चासकमान कालव्याच्या तीन वितरीकांची दयनीय स्थितीबाबत गेल्या काही दिवसांपासून सरपंच पुनम टेमगिरे यांचे पती दत्तात्रय टेमगिरे वेगवेगळ्या व्यासपीठावर पाठपूरावा करीत होते, मात्र यश काही येत नव्हते.

अखेर त्यांनी राज्याचे उप्तादन शुल्कमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मध्यस्थीने थेट जयंत पाटील यांचे दालन गाठले. जयंत पाटील यांनीही टेमगिरे यांचे निवेदन स्विकारले. यांच्या उत्साहाला त्यांनी दाद दिली, प्रश्नाचे गांभीर्य आणि कार्यकर्त्यांची व्याकुळता समजून घेवून त्यांनी निवेदन वाचले आणि निवेदनावर टिपणी लिहून देत वरील तीनही कालवे तात्काळ दुरुस्ती करुन देण्याचा आदेशही यावेळी दिला.
     

आपल्या पक्षाची सत्ता आणि आपल्या नेत्याने केलेल्या या तात्काळ कामाच्या यशाने दत्तात्रेय टेमगिरेही खूष झाले आहेत. त्यांनी वरील सर्व कामाचे श्रेय दिलीप वळसे पाटील यांना दिले आहे. महाविकास आघाडी सरकारच्या तात्काळ दखलीबाबत आपल्या भावनांना सोशल मिडियाद्वारे वाट करुन दिली.

अर्थात जयंत पाटील यांच्या आदेशाने संपूर्ण बुरुंजवाडीच्या तीन वितरीकांच्या दुरुस्तीने ज्या काही गावस्तरावरील सिंचन समस्या होत्या दूर होणार असल्याने गावाकडूनही दत्तात्रय टेमगिरे, अमोल नळकांडे यांचे अभिनंदन केले आहे.


हेही वाचा : मराठा तरुणांच्या आयुष्याशी सरकार खेळत आहे 

पुणे : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर हल्ला चढविला आहे.  'मराठा आरक्षणावरील तात्पुरती स्थगिती उठविण्यासाठी राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात सदोष याचिका दाखल केली आहे. हे सरकार मराठा समाजातील तरुणांच्या आयुष्याशी खेळत आहे,' असा गंभीर आरोप मेटे यांनी केला आहे. मराठा आरक्षणाबाबत पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मेटे म्हणाले की राज्य सरकारने 28 जुलै 2020 च्या परिपत्रकातून मराठा समाजाला आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातून वगळण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयातून मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर राज्य सरकारने सारवासारव सुरू केली आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com