ब्राह्मण समाजाकडून मला नेहमीच प्रेम मिळाले : चंद्रकांत पाटील  - I have always received love from the Brahmin community says Chandrakant Patil | Politics Marathi News - Sarkarnama

ब्राह्मण समाजाकडून मला नेहमीच प्रेम मिळाले : चंद्रकांत पाटील 

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 18 फेब्रुवारी 2021

ब्राह्मण समाजाकडून मला नेहमीच प्रेम मिळाले आहे. त्यामुळे ब्राह्मण समाजावर अन्याय करणारा मी माणूस नाही.

पुणे : ब्राह्मण समाजाकडून मला नेहमीच प्रेम मिळाले आहे. त्यामुळे ब्राह्मण समाजावर अन्याय करणारा मी माणूस नाही. ब्राह्मण समाजाच्या विकासासाठी माझे नेहमीच सहकार्य असते, त्यामुळे समाजाचे प्रश्न, मागण्या यासाठी मी नेहमी पाठपुरावा करेन, असे आश्वासन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिले.

re>

ब्राह्मण महासंघाच्या वतीने आयोजित एका अनौपचारिक कार्यक्रमावेळी ते बोलत होते. यावेळी महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे, पुणे शहर भाजप प्रवक्ते संदीप खर्डेकर, नगरसेवक अजय खेडेकर, आदींसह महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते.

पाटील म्हणाले की, ब्राह्मण समाजाकडून मला नेहमीच प्रेम मिळाले आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे काम करत असताना परिषदेचे संस्थापक बाळ आपटे आणि यशवंतराव केळकर यांच्या कुटुंबाचा मला नेहमीच स्नेह मिळाला. त्यामुळे ब्राह्मण समाजावर मी कधीही अन्याय केलेला नाही. समाजाच्या विकासासाठी माझे नेहमीच योगदान राहिले आहे. भाजप सरकारच्या काळात ब्राह्मण समाजाच्या विकासासाठी कोल्हापूरमध्ये अनेक उपक्रम सुरु केले. तसेच, उपक्रम पुण्यातही सुरु करण्यासाठी माझे नेहमीच सहकार्य राहिल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

मेट्रोमॅन श्रीधरन भाजपच्या वाटेवर ; निवडणुकही लढवणार...

भाजप सरकारच्या काळात समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी अमृत नावाने महामंडळ सुरु करणे प्रस्तावित होते. त्यासाठी महामंडळाचे नाव देखील रजिस्टर झाले होते. मात्र विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्याने महामंडळाचा प्रस्ताव बारगळला. आगामी काळात राज्यात भाजपचे सरकार आल्यास, या महामंडळासाठी प्रयत्न करु, असे पाटील यांनी स्पष्ट केले. ब्राह्मण समाजाचे राज्यव्यापी संघटन उभे करण्याचे महत्त्वाचे कार्य आनंद दवे व त्यांचे सर्व सहकारी करत असून याद्वारे ब्राह्मण समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी मदत होइल.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दंड बनतो तरी कुठे!
 

संघटनेच्या बांधणी संदर्भात पाटील म्हणाले की, संघटन ही एक ताकद आहे. संघटनेत काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याने आपले कान पितळाचे ठेवू नयेत. यातून संघटनेत सौहार्दाचे वातावरण राहते‌. त्यामुळे सर्वांनी एकदिलाने काम करावे व प्रश्न मार्गी लावावेत, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी ब्राह्मण महासंघाच्या वतीने मानपत्र देउन पाटील यांचा सत्कार करण्यात आला. दरम्याण, पाटील यांनी आनंद दवे यांच्या घरी भेट दिली व काल मुंज झालेल्या त्यांच्या मुलास चि. गणेश यास शुभेच्छा व आशीर्वाद दिले. यावेळी स्थायीसमिती अध्यक्ष हेमंत रासने उपस्थित होते.

Edited By - Amol Jaybhaye  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख