आज माझ्या शब्दाला किती किंमत आहे, हे मलाही माहिती नाही : शिंदे

महाजन यांच्या राज्यसभेसाठी शब्द टाकेन.
I don't  know how much my word is worth in the Congress party today : Sushilkumar Shinde
I don't  know how much my word is worth in the Congress party today : Sushilkumar Shinde

इंदापूर : रत्नाकर महाजन हे आज आम्हाला हवे आहेत. माझे जिथं कुठे चालेल, त्या ठिकाणी महाजन यांच्या राज्यसभेसाठी शब्द टाकेन. त्याबाबत तुम्ही निर्धास्त राहा. आजकाल शब्दाला किती किंमत आहे, हे मलाही माहिती नाही. पण, ती एकेकाळी होती, अशा शब्दांत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आपल्या काँग्रेस पक्षातील स्थानाविषयी भाष्य केले. (I don't  know how much my word is worth in the Congress party today : Sushilkumar Shinde)

इंदापूर तालुक्याचे सुपुत्र आणि राज्य नियोजन मंडळाचे माजी कार्यकारी अध्यक्ष रत्नाकर महाजन यांच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात शिंदे बोलत होते. मुंबई वृत्तपत्र संघ व राधिका सेवा संस्था यांच्या वतीने त्यांचा नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते.

शिंदे म्हणाले, शंकरराव बाजीराव पाटील असताना राज्यसत्तेत काय किंमत होती, ते आम्हाला माहिती आहे. त्यावेळी शिबिराला तुम्ही नव्हता. आम्हीसुद्धा वही-पेन घेऊन जायचो. ती एक काँग्रेसची विचारांची, शिबिरांची परंपरा होती. ती सध्या राहिलेली नाही, याचे आम्हाला दुःख होतंय. शिबिराची आणि विचाराची परंपरा सध्या राहिली नसल्याने आम्ही सध्या कुठे आहोत, हे पाहणे कठीण झालेले आहे. आमची ध्येय धोरणं चुकीची असली तरी ती बरोबर करण्यासाठी विचारांच्या शिबिराची गरज आहे. 

काँग्रेसचा कार्यकर्ता कसा असावा, याचे उत्तम उदाहरण म्हणजे रत्नाकर महाजन. इंदापूरकरांनी महाराष्ट्राला दिलेले सर्वोत्तम रत्न म्हणजे रत्नाकर महाजन. महाजन यांचे भाषण व शिबिरातील वैचारिक भूमिका आजच्या घडीला खूप महत्त्वाची आहे. महाजन हे सुरुवातीपासूनच राष्ट्र संघात मध्येकार्यरत होते. युवक क्रांती दलामध्ये त्यांनी काम केले आहे. आणीबाणीच्या काळात काँग्रेसबरोबर मतभेद झाले; परंतु त्यांनी आपली काँग्रेस पक्षावरील निष्ठा कायम ठेवत पक्षाचे विचार जपत पुन्हा एकदा काँग्रेसचे नेतृत्व स्वीकारले, असेही शिंदे म्हणाले. 

हर्षवर्धन पाटील म्हणाले की रत्नाकर महाजन एक अभ्यासू व्यक्तिमत्त्व व सुसंस्कृत विचाराचे स्पष्ट वक्ते आहेत. त्यांचे एक वैशिष्ट्य आहे जिथे असतील तिथे प्रामाणिकपणे काम करायचे, हे त्यांच्याकडून शिकण्यासारखे आहे. हल्ली काही माणसे सकाळी एकाकडे, तर दुपारी दुसरीकडेच असतात. महाजन यांनी राज्यातील सर्व महत्त्वाची पदे भूषविली आहेत, त्यांना आता राज्यसभेवर पाठवण्याची गरज आहे. तर ती शिफारस सुशीलकुमार शिंदेंनी करावी, इंदापूर तालुक्यातील सुपुत्राला राज्यसभेवर पाठवावे, असे आवाहन  पाटील यांनी केले.  

या वेळी माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, इंदापूरच्या नगराध्यक्षा अंकिता शहा, इंदापूर बाजार समितीचे माजी सभापती आप्पासाहेब जगदाळे, साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक, सोलापूर जिल्हा काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष प्रकाश पाटील, सत्कार समितीचे अध्यक्ष राजेंद्र तांबिले, कृष्णाजी यादव, महारुद्र पाटील, मयूरसिंह पाटील, अॅड. तेजस्वी पाटील, अॅड. लक्ष्मण शिंगाडे, अरविंद वाघ. ज. मा. मोरे. कालिदास देवकर, मुकुंद शहा, मुंबई वृत्तपत्र संघाचे प्रदेश उपाध्यक्ष मधुकर गलांडे, जिल्हाध्यक्ष महेश स्वामी, व पत्रकार उपस्थित होते.

सत्काराला उत्तर देताना रत्नाकर महाजन यांनी त्यांच्या आयुष्यातील अनेक आठवणींना उजाळा दिला. जितेंद्र जाधव यांनी सूत्रसंचालन केले, तर महारुद्र पाटील यांनी आभार मानले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com