मुख्यमंत्र्यांनी काय बोलयचे हे मी कसं ठरवू :अजित पवार

अनंत चतुर्दशीच्या दिवशी पुण्यातील केवळ अत्यावश्यक सेवेतील दुकाने सुरू राहतील. कोरोनाचा प्रदुर्भाव वाढू नये यासाठी विसर्जनाच्या दिवशी अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने बंद राहतील. असेही त्यांनी स्पष्ट केले.
ajit pawar uddhav thackeray.jpg
ajit pawar uddhav thackeray.jpg

पुणे : '''मुख्यमंत्री' काय म्हणाले मला माहित नाही, मी माझी माझी काम करत असतो, ''अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray)  यांच्या विधानावर प्रतिक्रीया देण्यास टाळले. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनामित्त (Marathwada Muktisangram Day)  आज औरंगाबादमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं होते. या कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरे यांनी 'आजी-माजी एकत्रित आले तर भावी सहकारी होऊ शकतात' असं विधान केलं होतं. त्यांच्या या विधानाने  राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. 

मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यावर अजित पवार यांना विचारले. मात्र त्यांनी या प्रश्नाला उत्तर देणे टाळले. "मुख्यमंत्र्यांनी काय बोलाव हे मी कसं ठरवू, ते राज्याचे प्रमुख आहेत. मला माहित नाही, मी माझी कामं करत असतो. जेव्हा मुख्यमंत्री  आणि माझी भेट होते तेव्हा, सरकारचे निर्णय, काय कसं चालवायचं, समस्या काय याच्याच चर्चा होतात. मी ही विकासाला महत्व देतो. दोन दिवसावर गणेश विसर्जन आहे तिकडे लक्ष द्यायचं आहे. तसेच कोरोनाचं  सावट आहे त्याकडे माझं लक्ष आहे. असं म्हणत अजित पवारांनी या प्रश्नाला उत्तर देणे टाळले. 

तसेच, चंद्रकांत पाटील केंद्रात मंत्री होणार असतील तर ते मोदींना (Narendra Modi) विचारलं पाहिजे, असंही त्यांनी स्पष्ट केल. दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव आणि गणपती विसर्जनाच्या पार्श्वभुमीवरही राज्यसरकारने घेतलेले निर्णयही जाहीर केले. अनंत चतुर्दशीच्या दिवशी पुण्यातील केवळ अत्यावश्यक सेवेतील दुकाने सुरू राहतील. कोरोनाचा  प्रदुर्भाव वाढू नये यासाठी विसर्जनाच्या दिवशी अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने बंद राहतील. असेही त्यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर, पुण्यातील मृत्युद आणि रुग्णवाढ कमी झाली आहे,  ही  परिस्थिती अशीच  राहिली तर 2 ऑक्टोबरला नवा निर्णय घेऊ,  असंही उपमुख्यमंत्री अजित  यांनी नमूद केले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com