devendra1.jpg
devendra1.jpg

'दुकान' बंद होऊ नये म्हणून फडणवीस टीका करीत असतात..

देवेंद्र फडणवीस हे त्यांचं दुकान बंद होऊ नये म्हणून ते टीका करीत असतात,'' असा टोला गृहमंत्री अनिल देशमुख लगावला आहे.

पुणे : ''विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे चांगलं केलं तरी टीकाच करतात, त्यांचं दुकान बंद होऊ नये म्हणून ते टीका करीत असतात,'' असा टोला गृहमंत्री अनिल देशमुख यांनी फडणवीसांना लगावला आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज येरवडा कारागृहाला भेट दिली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. 

देशमुख म्हणाले की येरवडा कारागृहात क्षमतेपेक्षा अधिक कैदी आहेत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे जेलची क्षमता वाढविण्यासाठी प्रस्ताव दिला आहे. या कारागृहात वेगवेगळ्या प्रकारचे कैदी आहेत, त्यामुळे कारागृहाच्या रचनेचा विचार करण्यात येत आहे. याबाबत एक मॅाडेल तयार करण्यात आले आहे. त्यांचे सादरीकरण झालं आहे.  

''कोरेगाव भीमा प्रकरणी चार्जशीटचा प्रस्ताव मंजूर केला आहे. याप्रकरणी शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे आणि हिंदू एकता आघाडीचे मिलिंद एकबोटे यांच्यावर रीतसर कारवाई करण्यात येईल,'' असे अनिल देशमुख यांनी सांगितले. येरवडा कारागृह प्रशासनाने विविध मागण्यांचे निवेदन अनिल देशमुख यांना दिले. 

अनिल देशमुख पोहोचले थर्टी फर्स्टसाठी पोलिस नियंत्रण कक्षात!
सगळ्यांना वेध लागले होते काल  थर्टी फर्स्ट मोठ्या जल्लोषात साजरा करण्याचे. पण पोलिस मात्र 'थर्टी फर्स्ट'ची रात्र शांततेत पार पडावी, यासाठी सायंकाळपासूनच रस्त्यावर कडेकोड बंदोबस्त देत उभे असतात. नागरीकांचा आनंद द्विगुणीत करणाऱ्या याच पोलिसांना खंबीर मानसिक आधार देण्यासाठी गुरूवारी दस्तुरखुद्द गृहमंत्र्यांनीच पोलिस नियंत्रण कक्षात हजेरी लावली.रस्त्यावर बंदोबस्त करणाऱ्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी "कोरोना काळातील कामाने तुम्ही नक्की थकला आहात, पण तुम्ही हिमतीने काम केले. यापुढे याच हिमतीने एकत्र लढत राहु आणि कोरोनामुक्त महाराष्ट्र" करु" अशा शब्दात पोलिसांना भक्कम विश्वास दिला !

सर्वसामान्य नागरीकांबरोबरच पोलिस कर्मचारी असो किंवा वरिष्ठ पोलिस अधिकारी. सगळ्यांमध्ये तितक्‍याच आत्मियतेने मिसळून त्यांच्याशी हितगुज साधत त्यांना मानसिक आधार देण्याची किमया गृहमंत्री अनिल देशमुख हे कायम साधतात. एखाद्या शहराचा दौरा करताना रस्त्यात बंदोबस्त करणाऱ्या पोलिसाचा वाढदिवस साजरा करणे असो किंवा कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवरील नाकेबंदीच्यावेळी पोलिसांमध्ये मिसळून त्यांच्यासमवेत चहा घेणे असो. कोरोनामुळे निधन झालेल्या पोलिस बांधवांच्या कुटुंबीयांशी भावनिक नाते निर्माण करण्यासाठीचे पत्र पाठविणे असो. अशा वेगवेगळ्या उदाहरणांमधून देशमुख यांनी आपल्या वैशिष्ट्यपुर्ण कामाची खासीयत पटवून दिलेली आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com