पुण्याच्या निवासी उपजिल्हाधिकारीपदी खराडे, हवेलीच्या प्रांत अधिकारीपदी आसवले 

खराडे यांनी यापूर्वी बारामती प्रांत अधिकारी म्हणून काम पाहिले आहे.
Sarkarnama - 2021-09-18T111255.323.jpg
Sarkarnama - 2021-09-18T111255.323.jpg

पुणे : पुण्याच्या निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांची बदली झाली आहे. त्यांच्या जागेवर हिम्मत खराडे (Himmat Kharade) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर, हवेलीच्या प्रांत अधिकारीपदी संजय आसवले (Sanjay Aswale) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

पुणे येथील मुद्रांक उपमहानिरीक्षक पदावर कार्यरत हिम्मत खराडे यांच्याकडे निवासी उपजिल्हाधिकारी पदाचा कारभार सोपविण्यात आला आहे. खराडे यांनी यापूर्वी बारामती प्रांत अधिकारी म्हणून काम पाहिले आहे.

CID : परमबीर सिंह नक्की आहेत तरी कुठे?  
सातारा येथे भूसंपादन अधिकारी म्हणून कार्यरत आसवले यांच्याकडे हवेली प्रांत म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे. आसवले यांनी यापूर्वी भोर आणि दौंड प्रांताधिकारी म्हणून काम पाहिले आहे. राज्य सरकारने शुक्रवारी रात्री उशिरा याबाबतचे आदेश जारी केले. 

विमा कंपन्या मुजोर तर शासन कमजोर ; आमदार पवार यांचा आरोप
डॉ. कटारे यांची बदली अंधेरी येथे मुद्रांक जिल्हाधिकारीपदी  करण्यात आली आहे. डॉ. कटारे यांनी निवासी उपजिल्हाधिकारीपदी असताना कोरोना कालावधीत उपाययोजनांबाबत उत्कृष्टपणे जबाबदारी पार पाडली. अतिवृष्टी बाधित शेतकरी, पूरग्रस्तांना मदत, पंतप्रधान किसान योजना यासह विविध सरकारी योजनांचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोचविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.  यापूर्वी हवेली प्रांत अधिकारी, महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट आणि पुण्यात निवासी उपजिल्हाधिकारी अशा विविध पदांवर करत असताना एक महिला अधिकारी म्हणून डॉ. कटारे यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

मुंबई : मुंबई (ATS)च्या टीम नागपाड़ा ने एक संशयित आरोपीला ताब्यात घेतलं आहे. एटीएस आणि क्राईम ब्रांचकडून सध्या याप्रकरणाचा तपास सुरू आहे. काही दिवसांपूर्वी दिल्ली पोलिसांनी केलेल्या मोठ्या कारवाही नंतर मुंबई च्या टीम ने त्यातील ७ व्या संशयित आरोपी ला ताब्यात घेतलं आहे. महाराष्ट्र एटीएस आणि गुन्हे शाखेने केलेल्या एकत्रित कारवाईत त्याला एकाला ताब्यात घेण्यात आलं.  

 Edited by : Mangesh Mahale  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com