आमदार भीमराव तापकीर यांनी तक्रार केलेल्या तहसीलदाराची बदली

लोकप्रतिनिधींशी सौजन्यपूर्वक वागा आणि राजशिष्टाचारदेखील पाळा.
Haveli Tehsildar Sunil Koli transferred to Palghar district
Haveli Tehsildar Sunil Koli transferred to Palghar district

खडकवासला (जि. पुणे) : हवेलीचे तहसीलदार (Haveli Tehsildar) सुनील कोळी (Sunil Koli) यांच्याकडून महाराष्ट्र नागरी सेवा नियममधील तरतुदींचा भंग होत असून, राजशिष्टाचार पाळला जात नाही. तसेच, त्यांच्या कामकाज करण्याच्या पद्धतीबाबत आमदार भीमराव तापकीर यांनी काही महिन्यांपूर्वी विधानसभेत तक्रार केली होती. अखेर दोन दिवसांपूर्वी तहसीलदार कोळी यांची पालघर (Palghar) जिल्हाधिकारी कार्यालयात तहसीलदारपदी बदली (transfer) करण्यात आली आहे. (Haveli Tehsildar Sunil Koli transferred to Palghar district)

जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका असलेल्या हवेली तहसील कचेरीत नागरिकांची वर्दळही कायम असते. सामान्य नागरिक तहसील कचेरीत गेल्यावर त्यांना हीन दर्जाची वागणूक दिली जाते, यांसह अनेक तक्रारी वरिष्ठ कार्यालयापर्यंत गेल्या होत्या. या बरोबरच विधानसभेतही प्रश्न उपस्थित झाल्याने तहसीलदार कोळी त्यांची बदली होणार, हे निश्चित झाले होते. पण, त्यांचा हवेली तहसीलदारपदाचा कार्यकाल पूर्ण झालेला नव्हता. त्यामुळे, तहसीलदार कोळी हे बदलीला स्थगिती (स्टे) आणण्यासाठी मॅटमध्ये गेले होते. पण, त्यांची ती मागणी ‘मॅट’ने फेटाळून लावली. त्यामुळे पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी बदलीचे आदेश दिले आहेत. पुण्याच्या तहसीलदार तृप्ती कोलते यांची हवेलीच्या तहसीलदारपदी बदली करण्यात आली आहे.

तहसीलदार सुनील कोळी यांच्याकडून महाराष्ट्र नागरी सेवा नियममधील तरतुदींचा भंग झाला आहे काय, तरतुदींचा भंग झाला असल्यास, जमीन महसूल व गौण खनिजाच्या वसुलीचे उद्दिष्ट, नियोजन, तहसील कार्यालयातील ई हक्क प्रणालीचे अर्ज प्रलंबित असणे. नियमितपणे कार्यालयात न येणे. नागरिकांना हीन दर्जाची वागणूक देणे. लोकप्रतिनिधींचे फोन त्वरित न घेणे. अनेक आवश्यक निर्णय प्रलंबित असणे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावांमध्ये भेटी न देणे, इत्यादी प्रकार तहसीलदारांकडून झाल्याचे मे २०२० मध्ये निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय?, असे असेल तर या प्रकरणी सरकारने चौकशी केली आहे काय, चौकशी केली असल्यास, संबंधितांवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे, कारवाई केली नसल्यास, त्याची विलंबाची कारणे काय आहेत? असे प्रश्न आमदार तापकीरांनी यांनी हवेली तहसीलदाराच्या विरोधात विधिमंडळात  उपस्थित केले होते. 

विधानसभेत झालेल्या विषयाला महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी लेखी उत्तराच्या माध्यमातून सूचना केल्या होत्या. यामध्ये हवेली तहसीलदारांनी कार्यालयात उपस्थित राहावे. नागरिकांच्या तक्रारी सोडवा, प्रलंबित कामे पूर्ण करा, तसेच, लोकप्रतिनिधींशी सौजन्यपूर्वक वागा आणि राजशिष्टाचारदेखील पाळा. याबाबत पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार हवेलीचे तहसीलदार सुनील कोळी यांच्या कार्यालयाची तपासणी हवेलीचे उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर यांनी केली होती. त्याअनुषंगाने प्रलंबित प्रकरणे व कामकाज पूर्ण करण्याबाबत हवेलीच्या उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत हवेलीच्या तहसीलदारांना कळविले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com