बांधकाम मंत्री इंदापूरचे असूनही रस्त्यांची लागली 'वाट' : हर्षवर्धन पाटलांची भरणेंवर टीका 

राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार हे बिघाडी सरकार आहे. या बिघाडी सरकारचा पंचनामा करण्याची वेळ आता आली आहे.
Harshvardhan Patil's criticism on Dattatreya bharane due to poor condition of the road
Harshvardhan Patil's criticism on Dattatreya bharane due to poor condition of the road

इंदापूर (जि. पुणे) : "राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार हे बिघाडी सरकार आहे. या बिघाडी सरकारचा पंचनामा करण्याची वेळ आता आली आहे. तसेच, इंदापूरचे लोकप्रतिनिधी हे सार्वजनिक बांधकाम खात्याचे राज्यमंत्री असूनही रस्त्यांची वाट लागली आहे,' अशा शब्दांत माजी सहकार मंत्री तथा भारतीय जनता पक्षाचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी केली. 

महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षाकडून राज्यभरात मोर्चा काढण्यात आला. त्याअंतर्गत इंदापूर भाजपच्या वतीने पंचायत समिती ते तहसील कार्यालयापर्यंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज (ता. 12 ऑक्‍टोबर) मोर्चा काढण्यात आला.

या वेळी महाविकास आघाडी सरकार, तालुक्‍याचे लोकप्रतिनिधी राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या निष्क्रियतेचा निषेध करण्यात आला. 

मुख्यमंत्री शिवसेनेचा असूनही इंदापूर तालुक्‍यातील शिवसेनेस आम्हास न्याय द्यावा; म्हणून प्रशासनाविरुद्ध मोर्चा काढावा लागतो, ही शोकांतिका आहे, असे सांगून पाटील म्हणाले, महिलांवरील अत्याचार, कोविड रुग्णांना सुविधा, कर्जमाफी योजना, शेती पिकांना नुकसानभरपाई, मराठा, धनगर व मुस्लिम आरक्षण याबाबत सरकार व लोकप्रतिनिधी अपयशी ठरले आहेत.

राज्यात अधिकाऱ्यांच्या बदल्या 15 जूननंतर करू नयेत, असा नियम असताना राज्य सरकार हे अर्थपूर्णपणे बदल्या करत आहे. इंदापुरात कोरोना रुग्णांना बेडशीट, ऑक्‍सिजन, व्हेंटिलेटर आदी सुविधा देण्यास लोकप्रतिनिधी अपयशी ठरले आहेत. 

या वेळी भाजप तालुकाध्यक्ष शरद जामदार, मारुती वणवे, तानाजी थोरात, माऊली चवरे, शीतल साबळे, उज्ज्वला घोळवे यांची भाषणे झाली. आंदोलनानंतर तहसीलदार सोनाली मेटकरी यांना निवेदन देण्यात आले. 

भाजपचे इंदापूर शहराध्यक्ष शकिल सय्यद, मंगेश पाटील, मयूरसिंह पाटील, दीपक जाधव, महेंद्र रेडके, रघुनाथ राऊत, शेखर पाटील, कैलास कदम, धनंजय पाटील, शिवाजी तरंगे, सुभाष काळे, अमोलइंगळे, दादा पिसे, चॉंद पठाण या वेळी उपस्थित होते. 

हेही वाचा : महिलांवरील अत्याचार थांबेपर्यंत ठाकरे सरकारला स्वस्थ बसू देणार नाही 

मुंबई : "राज्यातील महिलांवरील अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. मात्र, महाआघाडी सरकार ढिम्म बसून आहे. अशा असंवेदनशील सरकारला जागे करण्यासाठी भारतीय जनता पक्षातर्फे राज्यभर आंदोलन केले जात आहे. राज्यातील महिला सुरक्षित बनेपर्यंत भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते महाआघाडी सरकारला स्वस्थ बसू देणार नाहीत,' असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला. 

महिलांवरील अत्याचारांच्या वाढत्या घटनांच्या विरोधात भाजपतर्फे सोमवारी  आयोजित राज्यव्यापी निषेध कार्यक्रमात पुणे येथे सहभागी होऊन पाटील यांनी हा इशारा दिला. 

पाटील म्हणाले की, महाआघाडी सरकार सत्तेत आल्यापासून महिलांवर अत्याचाराची मालिकाच सुरु आहे. अल्पवयीन मुली, बालिकांवरही निर्घृण अत्याचार होत आहेत. मात्र, एवढे अत्याचार होऊनही राज्य सरकार या अत्याचाराच्या घटनांना रोखण्यासाठी काहीच हालचाल करत नाही. म्हणूनच या सरकारला जागे करण्यासाठी भाजपने रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यकर्ते महिलांवरील अत्याचाराच्या घटनांना रोखण्यासाठी कडक उपाय योजेपर्यंत भाजप कार्यकर्ते स्वस्थ बसणार नाहीत. 

 Edited By Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com