सध्या आम्ही विश्रांती घेतोय...त्यामुळे हे काम राज्यमंत्र्यांनी बघावं : हर्षवर्धन पाटील

सरकारदरबारी जे प्रश्न असतील, ते सरकार म्हणून त्यांनी निश्चित सोडवावेत.
Harshvardhan Patil and Dattatreya came together on the same platform
Harshvardhan Patil and Dattatreya came together on the same platform

पुणे : विधानसभा निवडणुकीनंतर एकाच व्यासपीठावर एकत्र आलेले राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे आणि माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यामध्ये राजकीय टोलेबाजी रंगली. ‘काही पत्रकारांचे प्रश्न आहेत. सरकारचे मंत्री येथे उपस्थित असल्यामुळे ते बघतील, त्या प्रश्नांचे काय ते. सध्या आम्ही विश्रांती घेतोय, त्यामुळे काम त्यांनी बघावं. (त्यावर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.) सरकारदरबारी जे प्रश्न असतील, ते सरकार म्हणून त्यांनी निश्चित सोडवावेत. त्यांना काही अडचण आली तर आम्हाला सांगा, आम्ही दिल्लीतून काही आणू, असे पाटील यांनी सांगितले. त्यावर राज्यमंत्री भरणे यांनी, ‘येत्या आठ दिवसांत पत्रकारांच्या प्रश्नासंदर्भात मुख्यमंत्र्यांकडे बैठक लावतो,’ अशा शब्दांत पत्रकारांना आश्वस्त केले. (Harshvardhan Patil and Dattatreya came together on the same platform)

इंदापूर तालुक्यातील जंक्शन येथे इंदापूर तालुका मराठी पत्रकार संघाने आयोजित केलेल्या डॉक्टर व पत्रकारांच्या सन्मान सोहळ्यात हर्षवर्धन पाटील बोलत होते. या वेळी मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्‍वस्त एस. एम. देशमुख, कार्याध्यक्ष शरद पाबळे, सोशल मीडयाचे राज्य निमंत्रक बापूसाहेब गोरे, पुणे जिल्हाध्यक्ष सुनिल लोणकर, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष जनार्दन दांडगे उपस्थित होते. 

यावेळी भरणे यांनी सांगितले की, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे साधे व सरळ आहेत.  राज्याला पहिल्यादां असे मुख्यमंत्री मिळाले आहेत. पत्रकारांच्या अडचणींसंदर्भात लवकरच मंत्रालयामध्ये बैठकीचे आयोजन करण्यात येईल. सोलापूरमधील कार्यक्रमामध्ये माझ्या बोलण्याचा पत्रकारांनी विपर्यास केला होता. कोरोनाच्या काळामध्ये डॉक्टरांनी स्वत:चा जीव धोक्यात घालून सर्वसामान्य जनतेला दिलेली सेवा कौतुकास्पद आहे. पत्रकारांनीदेखील जीव धोक्यात घालून काम केलेले आहे. 

पाटील म्हणाले की, इंदापूर तालुक्यातील पत्रकारांचा मोफत विमा उतरविण्याचे काम सुरु आहे. पत्रकारांच्या राज्य सरकारकडून अडचणी न सुटल्यास दिल्लीवरुन अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील.

देशमुख यांनी सांगितले की, मुख्यमंत्री पत्रकारांनाही भेटण्याची वेळ देत नाहीत. त्यांच्याकडे माहिती व जनसंपर्क कार्यालयाचा कारभारही आहे. पत्रकारांच्या अनेक अडचणी असून कोरोनाच्या काळात  सुमारे १६० पत्रकारांचा मृत्यू झाला आहे. पत्रकारांना फ्रंटलाईन वर्करचा दर्जा देवून पत्रकारांच्या अडचणी सोडविण्याची मागणी केली. 

या वेळी पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रवीण माने, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, नेचर डेअरीचे अध्यक्ष अर्जुन देसाई,  साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक, नीरा-भिमा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार, छत्रपतीचे उपाध्यक्ष अमोल पाटील, माजी अध्यक्ष कांतीलाल जामदार, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे,मोहन दुधाळ उपस्थित होते. 

या वेळी वालचंदनगरचे सहायक पोलिस निरीक्षक बिरप्पा लातुरे, पोलिस उपनिरीक्षक अतुल खंदारे, डॉ.प्रशांत महाजन, डॉ.मच्छिंद्र हेगडे, डॉ.नागनाथ जगताप, लॅब टेक्निशन रेश्‍मा कुदळे-बोराटे यांचा कोरोनायोद्धा म्हणून सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन इंदापूर तालुका मराठी पत्रकार संघटनेच्या वतीने तालुकाध्यक्ष राजकुमार थोरात, समन्यवयक धनंजय थोरात व जिल्हा सरचिटणीस सतीश सांगळे यांनी केले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com