मोठी कारवाई : कर्नाटकातून पुण्यात आलेला लाखो रुपयांचा गुटखा जप्त - Gutka Rs 78 lakh seized at Shikrapur Sanaswadi | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

चिपळूणमध्ये : पुराचे पाणी अपरांत हाँस्पिटलमध्ये शिरले त्यामुळे वीज पुरवठा बंद झाल्यामुळे व्हेंटिलेटरवरील ८ रुग्ण दगावले.
महाड तालुक्यातील तळीये गावातील 32 घरांवर दरड कोसळली | दरडीत घरांचे मोठे नुकसान | 72 लोक बेपत्ता झाल्याचा अंदाज| पोलिसांचे पथक घटना स्थळाकडे रवाना

मोठी कारवाई : कर्नाटकातून पुण्यात आलेला लाखो रुपयांचा गुटखा जप्त

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 9 जुलै 2021

शिक्रापूर पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली. 

शिक्रापूर  :  पुणे शहर पोलिसांच्या माहितीनुसार  शिक्रापूर Shikrapur पोलिसांनी सणसवाडी (ता.शिरूर) येथे ७८ लाखांचा बेकायदा गुटख्याचा मोठा साठा पकडला आहे.  हा संपूर्ण साठा कर्नाटकातून महाराष्ट्रात आला होता. याप्रकरणी ११ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी दिली. Gutka Rs 78 lakh seized at Shikrapur Sanaswadi

एक कंटेनर, एक पिकअप टेंपो तर एका छोटा हत्तीतून १९५ गोण्या भरुन हा गुटखा वितरणासाठी सणसवाडीपर्यंत काल (ता. ८) संध्याकाळी साडेचार वाजता पोहचल्यावर शिक्रापूर पोलिसांनी त्यावर कारवाई केली. याप्रकरणी ११ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी दिली. सर्व आरोपी हे बीड, परभणी व रायगड जिल्ह्यातील असून हे सर्व तात्पूरते मोशी-चाकण परिसरात राहत आहेत.  पुणे पोलिसांच्या माहितीनुसार काही गाड्यांमध्ये गुटखा वाहतूक होत आहे. ती शिक्रापूरच्या दिशेने आणि पुढे मराठवाड्याकडे जाणार असल्याची माहिती मिळाली होती. यावरुन शिक्रापूर पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली. 

या कारवाईत लखन अश्रुबा लोंढे, (वय 27, रा. साईपार्क बिल्डींग मोशी ता.हवेली), सुरेश रामभाऊ कसाब (वय 21, रा. चिमळी फाटा, नाशिक रोड, चाकण), कृष्णा बालाजी बिंडे (वय 21, रा मोशी), अंकीत शिव मोहन सिंग, (रा.चाकण),  बापु गवते (पूर्ण नाव व गाव अज्ञात),  अंकुर सुनिल गुप्ता (रा.चाकण), विरेंद्र बुध्दसेन गुप्ता (रा.करंजाडे, रायगड), महेश जसराज भाटी (रा.कोथरूड, पुणे), नरेश देवासी (रा.आळंदी), ओमजी (पुर्ण नाव व पत्ता माहित नाही), तिन्ही वाहनाचे मालक नाव व पत्ता माहीत नाही तसेच शोएब रोड लाईन्स पॅकर्स अँण्ड मुव्हर्सचे अज्ञात मालक आदी १४ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिस हवालदार सचिन अंकुश मोरे यांच्य फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांनी दिली. यापूर्वी बेकायदा गुटखा हा साधारण गुजरातवरुन येत असे मात्र, यावेळी कर्नाटकहून आल्याने या संपूर्ण प्रकरणाची माहिती जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ.अभिनव देशमुख व सर्व वरिष्ठ अधिका-यांना कळविली आहे. वरिष्ठ पातळीवरही या बेकायदा गुटखा-पानमसाल्याच्या वाहतूकीचा तपास हॊणार असल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांनी दिली.

मीच रामविलास पासवान यांचा खरा राजकीय वारसदार, चिराग नाही.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रीमंडळाचा विस्तार केला आहे. ४३ नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. यावेळी पशुपती कुमार पारस यांच्याकडे अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रिपदाची जबाबदारी दिली आहे. पशुपती कुमार पारस यांचे पुतणे चिराग पासवान यांनी त्यांना शपथ घेण्यास विरोध केला होता. पारस यांच्याविरोधात चिराग पासवान यांनी पासस उच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. यावरुन पशुपती कुमार पारस यांनी चिराग यांना प्रत्युत्तर दिलं आहे. 
Edited by : Mangesh Mahale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख