खुषखबर ; दुकाने रात्री ८ पर्यंत तर हॅाटेल १० पर्यंत सुरु राहणार  - The good news; Shops will be open till 8 pm and hotels till 10 pm | Politics Marathi News - Sarkarnama

खुषखबर ; दुकाने रात्री ८ पर्यंत तर हॅाटेल १० पर्यंत सुरु राहणार 

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 11 जून 2021

पुण्यातील कोरोना रुग्णाची संख्या मागील काही दिवसापासून सातत्याने कमी होत आहे. त्यामुळे शहरात अनेक निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत.

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आता हळूहळू अनलॅाक करण्यात येत आहे. त्यानुसार पुण्यात आज उमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी कोरोना बाबत आढावा बैठक घेतली. पुण्यातील कोरोना रुग्णाची संख्या मागील काही दिवसापासून सातत्याने कमी होत आहे. त्यामुळे शहरात अनेक निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत.  (The good news; Shops will be open till 8 pm and hotels till 10 pm) 

त्यानुसार शहरासाठी नवीन नियम अजित पवार यांनी शुक्रवारी जाहीर केले. त्यानुसार पुणे शहरात सोमवार पासून संध्याकाळी 8 वाजेपर्यंत दुकाने सुरू राहतील, हॉटेल रात्री 10 पर्यंत सुरू राहणार आहेत. तर  अभ्यासीका सुरू करण्यात येणार आहेत. सिनेमागृह, नाट्यगृहांच्या बाबतीत पुढील आठवड्यात निर्णय घेणार असल्याचे पवार यांनी सांगितले. मॉल बाबत नियमावली जाहीर करून सुरु करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. १८ वर्षापासून पुढील दिव्यांगाच्या लसीकरणाला सुरुवात झाली आहे. हे निर्बंध केवळ पुणे शहरासाठी शिथील करण्यात आले आहे. पुणे ग्रामीण व पिंपरी-चिंचवड मधील पॅाझिटिव्हिटी रेट ५ टक्यांच्या पुढे आहे.

हे ही वाचा : आमची दोस्ती जंगलातील वाघाशी होती; पिंजऱ्यातील नव्हे: चंद्रकांतदादांचा शिवसेनेला चिमट

दरम्यान, पुण्यातील ॲक्टिव्ह कोरोना रूग्णांची संख्या कमी झाली आहे. एप्रिल आणि मे या दोन महिन्यात पुण्यातील हाताबाहेर गेलेली परिस्थिती आता रूळावर आली असून काही बंधनांसह पुण्यातील दैनंदिन व्यवहार सुरू झाले आहेत. 

गेल्या काही दिवसात पुण्यातील रूग्णसंख्येत सातत्याने घसरण होत आहे. रूग्णसंख्या कमी झाल्याने पुण्यातील शनिवार-रविवारचा कडक लॉकडाऊन उठविण्यात आला आहे. सोमवार पासून सर्व व्यवहार सकाळी सात ते रात्री आठ या वेळेत सुरू होणार आहेत. शहराच्या तुलनेत जिल्ह्याच्या ग्रामीण भागात रूग्णांचा आकडा थोडासा जास्त असला तरी गेल्या आठवड्याच्या तुलनेत रूग्णसंख्या कमी होऊ लागली आहे.

हे ही वाचा :  राष्ट्रवादीच्या घड्याळातील काटा हा दहा वाजून दहा मिनिटांवरच का?

कोरोनाच्या पहिल्या लाटेत गेल्यावर्षी लॉकडाऊन उठवताना घाई करण्यात आल्याचे आरोग्य क्षेत्रातील तज्ञ सांगत असल्याने यावेळी ती चूक राज्य सरकार पुन्हा करणार नाही. संभाव्य तिसरी लाट येणार नाही आणि आली तरी त्यावर नियंत्रण मिळविता आले पाहिजे, अशी तयारी राज्य सरकारकडून करण्यात येत आहे. त्यामुळे सर्व पातळ्यांवर काळजी घेण्यात येत आहे.

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख