मेंढपाळांना स्वसंरक्षणासाठी रिव्हाॅल्वर किंवा बंदूक द्या : राष्ट्रवादीच्या मंत्र्याची मागणी - Give revolvers or guns to shepherds for self-defense Demands NCP minister | Politics Marathi News - Sarkarnama

मेंढपाळांना स्वसंरक्षणासाठी रिव्हाॅल्वर किंवा बंदूक द्या : राष्ट्रवादीच्या मंत्र्याची मागणी

भारत नागणे
गुरुवार, 24 सप्टेंबर 2020

भरणे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. 

पंढरपूर :  धनगर समाजातील मेंढपाळांवर अनेक वेळा हल्ले झाले आहेत. मेंढपाळांना स्वसंरक्षणासाठी रिव्हाॅल्वर किंवा बंदूक देण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादीच्या एका मंत्र्याने केली आहे. त्यांच्या या मागणीमुळे उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.

माळशिरस, सांगोला आणि पंढरपूर तालुक्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहाणी आज पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केली. त्यानंतर पंढरपुरात पत्रकारांशी बोलताना मेंढपाळांना स्वसंरक्षणासाठी रिव्हाॅल्वर देण्याची मागणी केली.

धनगर समाजाला आरक्षण देण्याविषयी राज्य सरकार सकारात्मक आहे. कोविड मुळे धनगर समाजाच्या विकासासाठी मंजूर असलेला निधी देता आला नाही. यापुढच्या काळात धनगर समाजाचे प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावले जातील असे ही मंत्री भरणे यांनी सांगितले. पीक नुकसान पाहणीनंतर संबंधित अधिकार्यांना पंचनामे करण्याचे आदेश दिले.

ही पण बातमी वाचा 

बिरोबाला फसवलेले पडळकर आता विठ्ठलाला फसवायला आलेत: विक्रम ढोणे  

पंढरपूर: दोन वर्षापुर्वी आरेवाडी येथील बिरोबाच्या बनात धनगर आरक्षणप्रश्नी खोट्या शपथा घेतलेले गोपीचंद पडळकर यांनी आता नव्याने फसवणुकीचा डाव मांडला आहे. विठ्ठलाच्या नावाने धनगर समाजाची फसवणूक करण्यासाठी ते पंढरपुरात आंदोलन करत आहेत. विठ्ठल मंदिरात ढोल बजाओ आंदोलन करणाऱ्या पडळकरांनी स्वत:च्या स्वार्थासाठी धनगर आरक्षणाचा ढोल कधीच फोडला आहे. त्यामुळे पडळकरांच्या भाजपप्रणित एजेंड्यापासून धनगर समाजाने सतर्क राहावे, असे आवाहन धनगर विवेक जागृती अभियानाचे संयोजक विक्रम ढोणे यांनी केली आहे. 

समाजाची सर्वाधिक फसवणूक करणाऱ्या पडळकरांना धनगर आरक्षणप्रश्नी आंदोलन करण्याचा नैतिक अधिकार नाही. पंढरपूरमधील आंदोलन म्हणजे निव्वळ स्टंट, 'इव्हेंट' आहे, असेही ढोणे यांनी म्हटले आहे.

भाजपचे विधान परिषद आमदार गोपीचंद पडळकर यांनी चार दिवसांपुर्वी धनगर एसटी आरक्षणाचा अध्यादेश राज्य शासनाने काढावा आणि तातडीने दाखले द्यावेत, अशी मागणी करणारे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवले आहे. तसेच 25 सप्टेंबरला पंढरपूर येथे आरक्षणप्रश्नी 'ढोल बजाओ' आंदोलन घोषित केले आहे. त्यासंदर्भात विक्रम ढोणे यांनी आज धनगर विवेक जागृती अभियानाची भुमिका मांडली.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख