दुचाकीवरून घरी निघालेले चौघे पुरात वाहून गेले; तिघांचे मृतदेह मिळाले, एकजण बेपत्ता 

मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये एका दांपत्याचा समावेश आहे.
The four were swept away in the flood waters in Daund
The four were swept away in the flood waters in Daund

दौंड (पुणे) : दोन दुचाकींवरून घरी निघालेले चौघे जण बुधवारी (ता. 14 ऑक्‍टोबर) झालेल्या मुसळधार पावसाने ओढ्याला आलेल्या पुराच्या पाण्यात वाहून गेले. त्यातील तिघांचे मृतदेह मिळाले असून त्यांच्यासमवेत असलेली चौथी व्यक्ती बेपत्ता आहे. ही घटना दौंड तालुक्‍यातील राजेगाव-खानवटे रस्त्यावर बुधवारी रात्री घडली. 

मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये एका दांपत्याचा समावेश आहे. स्थानिक ग्रामस्थांनी तिघांचे मृतदेह पाण्याबाहेर काढले आहे. त्यांच्यासमवेत असलेल्या एका व्यक्तीचा स्थानिक ग्रामस्थ, पोलिस आणि मच्छिमार हे आज सकाळपासून शोध सुरू आहे. 

शहाजी गंगाधर लोखंडे (वय 52), अप्पासाहेब हरिश्‍चंद्र धायतोंडे (वय 55) व कलावती अप्पासाहेब धायतोंडे (वय 48, सर्व रा. खानवटे, ता. दौंड) अशी पुराच्या पाण्यात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींची नावे आहेत. सुभाष नारायण लोखंडे (वय 48 रा. खानवटे) हे पुराच्या पाण्यात बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे. 

गेली सहा दिवसांपासून दौंड तालुक्‍यास विजेच्या कडकडाटांसह मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. अप्पासाहेब धायतोंडे व सुभाष लोंढे यांच्यासह चौघेजण बुधवारी (ता. 14) रात्री दोन दुचाकींवरून राजेगाववरून गावी खानवट्याकडे निघाले होते.

मुसळधार पावसामुळे या मार्गावरील तुकाई मंदिराजवळील ओढ्याला पूर आला होता. रात्रीच्या अंधारात ओढ्याच्या वाढलेल्या पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांनी दुचाकी त्या पाण्यात घातली; परंतु पाण्याला प्रचंड वेग असल्याने चारही जण दुचाकींसह पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. 

स्थानिक ग्रामस्थांनी आज (ता.15 ऑक्‍टोबर) सकाळी ओढ्याच्या प्रवाहात शोध घेतला. त्या वेळी रस्त्यापासून 40 ते 100 फुट अंतरावर पाण्यात शहाजी लोखंडे, अप्पासाहेब धायतोंडे, कलावती धायतोंडे या तिघांचे मृतदेह आढळून आले. तीनही मृतदेह शवविच्छेदनासाठी दौंड शहरातील उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. बेपत्ता असलेल्या सुभाष लोंढे यांचा शोध सुरू आहे. 

Edited By Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com