Former MP Shivajirao Adhalrao Patil replied to MLA Dilip Mohite
Former MP Shivajirao Adhalrao Patil replied to MLA Dilip Mohite

राष्ट्रवादीच्या श्रेष्ठीपर्यंत ‘त्या गोष्टी’ गेल्याने मोहितेंनी गोळीबाराचे कुभांड रचले

मी अशा भानगडीतकधीही पडत नाही.

राजगुरूनगर (जि. पुणे) : खेडचे आमदार दिलीप मोहिते यांना त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातही कुणी विचारत नाही. त्यामुळे ते ‘मंत्रीपद दिले नाही, मी राजीनामा देतो. तहसीलदारांची बदली झाली नाही, मी राजीनामा देतो,’ असे बालिशपणाचे राजकारण करत असतात. राज्यात तीन पक्षांची आघाडी असतानाही घटक पक्षांच्या सदस्यांना फितवून, आमिषे दाखवून आणि बळजबरीने शिवसेनेच्या सभापतींवर अविश्वास ठराव दाखल करण्यास प्रवृत्त केले. त्यानंतर त्या सदस्यांना स्वतःच्या रिसॉर्टवर ठेवले. त्या ठिकाणी ३० ते ३५ गुंड नेऊन ठेवले. या गोष्टी राष्ट्रवादी काँग्रेसच्या श्रेष्ठींपर्यंत गेल्या. ते बिंग फुटल्यानंतर सर्वांचे लक्ष दुसरीकडे वळावे; म्हणून त्यांनी हे गोळीबारचे कुभांड रचले, असा आरोप शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आमदार मोहिते यांच्यावर केला. (Former MP Shivajirao Adhalrao Patil replied to MLA Dilip Mohite)

खेडचे पंचायत समितीचे सभापती भगवान पोखरकर यांच्यावरील अविश्वास ठरावामुळे गुरुवारी (ता. २८ मे) डोणजे येथील रिसॉर्टवर झालेल्या मारामारीनंतर आमदार मोहिते यांनी या प्रकरणाचे सूत्रधार आढळराव पाटील असल्याचा आरोप केला होता. त्याला आढळरावांनी पत्रकार परिषद घेत उत्तर दिले. 

आढळराव म्हणाले की, सभापती भगवान पोखरकर व त्यांच्या सहकाऱ्यांना त्या ठिकाणाहून शिवसेनेच्या पंचायत समिती सदस्यांचे फोन आल्यानंतर, त्यांना घेण्यासाठी ते तेथे गेले होते. त्यावेळी तेथील उपस्थित गुंडांनी त्यांना विरोध केल्याने मारामारी झाली. परंतु गोळीबार झाला नाही व त्यांच्याकडे हत्यारेही नव्हती. सीसीटीव्हीत तसे दिसत नाही. माझ्यावर या प्रकरणाचा सूत्रधार असल्याचा केलेला आरोप खोटा असून, मी अशा भानगडीत पडत नाही. अशा प्रकारचा थिल्लरपणा कधीही करणार नाही. मोहिते यांच्यावर मात्र विनयभंगाचे, माराहाणीचे गुन्हे आहेत. आमदार होण्यापूर्वी त्यांच्यावर 302 चाही गुन्हा होता. त्यांनी माझ्यावर मारामारी प्रकरणाचा सूत्रधार असल्याचा आरोप करणे हास्यास्पद आहे. मोहिते जेव्हा-जेव्हा सत्तेत येतात, तेव्हा ते सत्तेचा दुरुपयोग करतात. मोहिते आमदार नसताना गेल्या पाच वर्षांत खेड तालुक्यात शांतता होती.

....म्हणून मोहितेंना पंचायत समितीत सत्ता हवीय 

खेड पंचायत समितीची मंजूर असलेली नवीन इमारत ठरलेल्या ठिकाणीच व्हावी, याचा आग्रह शिवसेनेने धरला आहे. आमदार मोहिते यांना तसे व्हावयास नको आहे. त्यासाठी स्वतःची सत्ता पंचायत समितीत आणावयाची आहे. त्या कारणावरूनच त्यांनी हे सर्व खालच्या पातळीचे राजकारण केले आहे, असा आरोपही आढळराव यांनी केला. 

महाविकास आघाडीवर परिणाम होणार नाही

खेडमधील अविश्वास प्रकरणाचा राज्यातील महाविकास आघाडीवर काही परिणाम होणार नाही. कारण, इतर सर्व ठिकाणी आघाडीतील घटक पक्षांमध्ये परस्पर सामंजस्य आहे. पुणे जिल्ह्यातही सर्व तालुक्यांमध्ये एकमेकांचे चांगले संबंध आहेत. फक्त खेड तालुक्यातच नेहमी समस्या येते, त्याचे कारण दिलीप मोहिते असून त्यांच्यावर त्यांच्या पक्षाने कारवाई करावी, अशी मागणीही आढळराव पाटील यांनी बोलताना केली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com