खासदार अमोल कोल्हे यांना गोळ्या घालण्याची भाषा करणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल - fir registered against three persons who threatened mp amol kolhe | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मंत्रिमंडळाची बैठक सुरु असताना जयंत पाटलांची प्रकृती बिघडली...ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल

खासदार अमोल कोल्हे यांना गोळ्या घालण्याची भाषा करणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 2 जून 2020

अक्षय बोऱ्हाडे प्रकरणावरुन गेल्या पाच दिवसात संपूर्ण राज्यभर चांगलेच राजकारण रंगले. शिवसेना-राष्ट्रवादी, राष्ट्रवादी-भाजपा असे कार्यकर्त्यांचे गट होवून चर्चा, आरोप-प्रत्यारोप, हेवे-दावे असे सगळे नाट्य घडले आणि त्यातच जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांची इंट्री झाल्यानंतर हे प्रकरण पेल्यातले वादळ ठरले.

पुणे : अक्षय बो-हाडे प्रकरणावरुन खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्यावर तसेच त्यांच्या कार्यकर्त्यांवर अश्लिल कमेंट्स करणाऱ्या व जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या शिर्डी (जि. नगर) येथील तिघांवर नारायणगाव पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. संदीप पाटील यांच्याकडे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी तक्रार केल्यानंतर सदर गुन्हा दाखल करण्यात आला असून तिनही आरोपी लवकर नारायणगाव पोलिस स्टेशनमध्ये हजर केले जाणार असल्याची माहिती नारायणगाव पोलिसांनी दिली.

अक्षय बोऱ्हाडे प्रकरणावरुन गेल्या पाच दिवसात संपूर्ण राज्यभर चांगलेच राजकारण रंगले. शिवसेना-राष्ट्रवादी, राष्ट्रवादी-भाजपा असे कार्यकर्त्यांचे गट होवून चर्चा, आरोप-प्रत्यारोप, हेवे-दावे असे सगळे नाट्य घडले आणि त्यातच जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांची इंट्री झाल्यानंतर हे प्रकरण पेल्यातले वादळ ठरले. दरम्यानच्या काळात शिर्डी (जि.नगर) येथील 'देशमुख फ्रेंड सर्कल, महाराष्ट्र राज्य' या फेजबुक ग्रुपवरील तिघांनी अक्षय बो-हाडे प्रकरणी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची पाठराखण करणारांची गय नाही, भावपूर्ण श्रध्दांजली असा मजकुर लिहून डॉ. कोल्हे यांच्यावर अश्लाघ्य भाषेत टिका केली. या शिवाय त्यांना एकेरी भाषेत बोलून शिर्डीला बोलावले व तिथे आल्यावर गोळ्या घालण्याचे लिखानही अश्लाघ्य भाषेत लिहीले. सदर पोस्ट पाहून डॉ. कोल्हे यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी कोल्हे यांना कळविली. त्यानुसार जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. संदीप पाटील यांनी ही बाब गांभिर्याने घेतली. त्यातच नारायणगाव (ता.जुन्नर) येथील सागर शशिकांत भुजबळ (वय, ४०) यांनी रितसर तक्रार दाखल करताच शिर्डीच्या तिन आरोपींवर आयटी अ‍ॅक्ट व शिवीगाळ, जिवे मारण्याची धमकी आदी गुन्हे दाखल करण्यात आले असून लवकरच तिघांनाही अटक करुण प्रकरणाच्या अधिक खोलात जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान या प्रकरणी नारायणगाव पोलिसांनीही वरील माहितीला तसेच गुन्हा दाखल होवून तपास सुरू केल्याच्या माहितीला दुजोरा दिला.

तुम्हाला पेन्शनसुद्धा मिळू देणार नाही : हसन मुश्रीफ   
कोल्हापूर  : वास्तविक या पावसाळ्यात आंबेओहोळ आणि नागणवाडी धरणात पाणी अडविणे अपेक्षित होते. परंतु; लॉकडाऊनमुळे तीन महिने काही काम करता आली नाही, हे ठीक आहे. मात्र, पावसाळ्यानंतर या दोन्ही प्रकल्पांची पूर्तता यावर्षी झाली नाही तर यासंबंधी जबाबदार तुम्हा सगळ्याच अधिकाऱ्यांच्या खातेनिहाय चौकशा लावतो. तुम्हाला कुणालाही पेन्शनसुद्धा मिळू देणार नाही, असा दम ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी अधिकाऱ्यांना दिला. या दोन्ही प्रकल्पाच्या कंत्राटदारांना सुद्धा ब्लॅक लिस्ट करू, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख