जमावबंदीचा भंग करणे पडले महागात; फत्तेचंद रांका यांच्यासह 58 व्यापाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल - Filed case against 58 traders including Fatehchand Ranka | Politics Marathi News - Sarkarnama

जमावबंदीचा भंग करणे पडले महागात; फत्तेचंद रांका यांच्यासह 58 व्यापाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 9 एप्रिल 2021

पोलिसांनी त्यांना कोणत्याही प्रकारची बेकायदेशीर कृती न करता, तेथून जाण्यास तोंडी सांगितले होते.

पुणे  : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी शहरातील व्यापाऱ्यांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन व साथरोग अधिनियमानुसार विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुरुवारी रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

याप्रकरणी पोलिस हवालदार गणेश तुर्के (वय. 48) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरुन फेडरेशन आॅफ ट्रेड असोसिएशन आॅफ पुणेचे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांच्यासह 58 जणांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन व साथरोग अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्य सरकारने 30 एप्रिलपर्यंत दुकाने बंद ठेवण्याच्या घेतलेल्या निर्णयाच्या विरुद्ध व्यापाऱ्यांनी गुरुवारी सकाळी लक्ष्मीरोडवर आंदोलन केले होते.

राष्ट्रवादीचा राजू शेट्टींना दे धक्का : स्वाभिमानीच्या माजी जिल्हाध्यक्षांसह कार्यकत्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संघटनेचे अध्यक्ष फत्तेचंद रांका व त्यांच्या साथीदारांनी कोरोना नियमाच्या पार्श्वभूमीवर शहरात लागू असलेल्या आदेशाचे उल्लघन करीत आंदोलन करून घोषणाबाजी केली. उंबऱ्या गणपती चौक ते विजय टॅाकीड चौकादरम्यान लक्ष्मीरोडवर रांका ज्वेलर्सच्या दुकानासमोर एकत्र जमा होऊन कोरोना साथीच्या रोगामुळे सार्वजनिक आरोग्य धोक्यात येईल अशी कृती केली.

जमावबंदीचा भंद करुन आंदोलन पडणार महागात; राष्ट्रवादीचे पदाधिकारी अडचणीत 
 

यावेळी पोलिसांनी त्यांना कोणत्याही प्रकारची बेकायदेशीर कृती न करता, तेथून जाण्यास तोंडी सांगितले होते. त्यामुळे आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास विश्रामबाग पोलिस करत आहेत.   
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख