'मनोहर मामांपासून माझ्या जिवितास धोका' ; दुसरी तक्रार दाखल

मला आणि माझ्या मित्राला रात्रभर पोलिस ठाण्यातला बसवून ठेवले.
Sarkarnama (50).jpg
Sarkarnama (50).jpg

पुणे : आदमापूर (जि. कोल्हापूर) येथील बाळूमामाचे Balu Mama भक्त आणि करमाळा तालुक्यातील उंदरगाव येथील मनोहर मामा याच्या अडचणी कमी होताना दिसत नाही, त्याच्यावर बारामती येथे फसवणुकीची तक्रार दाखल झाल्यानंतर आता इंदापुरातील एका व्यक्तीने करमाळा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ''मनोहर मामा यांनी आपली फसवणूक केली आहे, त्यांच्यापासून माझ्या जिवितास धोका आहे,'' अशी तक्रार रवींद्र राघु म्हेत्रे (रा.शिंदेवाडी काझड ,ता. इंदापूर, जि.पुणे ) यांनी केली आहे.

बारामती येथील  महेश नानासाहेब आटोळे यांनी यापूर्वी त्यांच्याविरोधात  तक्रार दाखल केली आहे. अंधश्रद्धेतून सात लाखाची फसवणूक केल्याचा आरोप तक्रार अर्जात करण्यात आला आहे.  'मनोहर भोसले यांनी फसवणूक केली असून मला त्यांच्यापासून जिवितास धोका आहे, त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा,' अशी मागणी म्हेत्रे यांनी यांनी तक्रार अर्जात केली आहे.    

रविंद्र म्हेत्रे यांनी तक्रारी अर्जात म्हटलं आहे की..
माझी पत्नी आजारी असल्याने तिला मी उंदरगाव येथे उपचारासाठी घेऊन आलो. मनोहर भोसले यांनी 21 हजारांची पावती फाडून पूजा करण्यास सांगितले. त्यानंतर एक लाख रूपये खर्च लागेल असे सांगून माझ्याकडून एक लाख रुपये त्यांचे शिष्य विशाल वाघमारे यांनी घेतले. माझ्या पत्नीच्या प्रकृतीत फरक पडत नाही, म्हटल्यानंतर मी भोसले यांना विचारणा केली असता एक दोन दिवसात फरक पडेल, फरक नाही पडला तर पैसे देतो असे सांगितले. 

'तुमचा आसाराम बापू करू' मनोहर मामांना धमकी  
विशाल वाघमारे यांनी मला फोन करून राशीन (जि. अहमदनगर) येथे बोलावले. याठिकाणी आल्यानंतर भोसले व त्यांच्या अंगरक्षकाने मला दिली शिवीगाळ दमदाटी केली. मनोहर भोसले, नरेंद्र सांगळे व त्यांच्या अन्य सहकाऱ्यांनी शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरुवात केली. मला व माझा मित्राला मारहाण करून पैसे देत नाही काय करायचे ते कर म्हणून सांगितले. करमाळा पोलिस ठाण्यात आम्हाला बांधून आणले. माझ्या व माझ्या मित्रावर अॅट्रॉसिटीची केस दाखल करून रात्रभर पोलिस ठाण्याला बसवून ठेवलं. मला आणि माझ्या मित्राला रात्रभर पोलिस ठाण्यातला बसवून ठेवले.  मनोहर भोसले यांनी फसवणूक केली असून मला त्यांच्यापासून जिवितास धोका आहे, त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com