काँग्रेस-राष्ट्रवादीच्या समर्थकांमध्ये तुंबळ हाणामारी

या प्रकरणी सर्व आरोपींना अटक करण्यातआली आहे.
Fighting broke out between two groups of Congress' Vishnu Raut and NCP's Kiran Raut in Velhe taluka
Fighting broke out between two groups of Congress' Vishnu Raut and NCP's Kiran Raut in Velhe taluka

पुणे  ः वेल्हे तालुक्यातील अंत्रोली येथील राजकीय वैमनस्यातू दोन्ही काँग्रेसमधील राजकीय वाद उफाळला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी युवक तालुका अध्यक्ष व जिल्हा उपाध्यक्ष किरण राऊत आणि वेल्हे तालुका काँग्रेसचे अध्यक्ष विष्णू उर्फ नाना राऊत यांच्या गटांत मध्ये तुंबळ हाणामारी झाली. परस्पर  विरोधी तक्रारीवरून या दोघांच्या विरोधात वेल्हे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी सर्व आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती वेल्ह्याचे सहायक पोलिस निरीक्षक मनोज पवार यांनी दिली.

याबाबत वेल्हे पोलिसांनी सांगितले की, अंत्रोली येथील जखनी मंदिरामागे पूर्व राजकीय वैमनस्यातून दोन गटांत हाणामारी झाली. काँग्रेसचे हवेली तालुकाध्यक्ष विष्णू उर्फ नाना राऊत गटाचे गावचे विद्यमान सरपंच नवनाथ शंकर राऊत (वय ३८) हे अंत्रोली गावातील राजू बबन ठाकर यांच्या घराकडून जखनी माता मंदीराकडे जात होते. त्यावेळी  बेकायदेशीर जमाव जमवून सरपंच नवनाथ राऊत यांना लाकडी बांबूने व दांडक्याने मारहाण करण्यात आली. त्यावेळी त्यांचे चुलत भाऊ दिलीप महादू राऊत व विशाल चंद्रकांत राऊत हे भांडण सोडवण्यासाठी गेले असता त्यांनाही मारहाण करून गंभीर दुखापत केली.

या प्रकरणी सरपंच नवनाथ राऊत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष किरण महिपती राऊत, मोतीराम भगवंत राऊत, संजय मोतीराम राऊत, समीर गणपत राऊत, गणपत गेण राऊत, अरुण सोमाजी राऊत, सुनील रामभाऊ राऊत, संभाजी मारुती राऊत ह्‌षीकेश संभाजी राऊत, तेजस संभाजी राऊत, गणेश सुरेश राऊत, उमेश सुरेश राऊत, रमेश दत्तात्रेय राऊत, गणेश दत्तात्रेय राऊत, गणेश अशोक राऊत, अमोल गणपत राऊत, अमोल शिवाजी राऊत, सचिन नारायण राऊत, करण विकास राऊत, शुभम किसन राऊत, रुपेश केरु राऊत, समीर हनुवती राऊत, ज्ञानेश्वर हनुमंत राऊत (सर्व रा. अंत्रोली, ता. वेल्हे) यांच्यावर वेल्हे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
 
दुसरी तक्रार राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष किरण राऊत यांचे समर्थक संजय राऊत यांनी दिली आहे. त्यानुसार राष्ट्रवादी गटाचे संजय मोतीराम राऊत (वय २३) यास व त्याचे वडील मोतीराम राऊत यांना राजकीय वैमनस्यातून मारहाण करुन त्यांच्या घरासमोरील मॅक्स गाडी फोडून नुकसान करण्यात आले.

त्याप्रकरणी संजय मोतीराम राऊत यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, वेल्हे तालुका काँग्रेसचे अध्यक्ष विष्णू गेनू राऊत, नवनाथ शंकर राऊत, विशाल चंद्रकांत राऊत, दिलीप महादू राऊत, ज्ञानोबा नामदेव राऊत, रामभाऊ नामदेव राऊत, दत्ता सोमाजी राऊत, चेतन दत्ता राऊत, आकाश तानाजी राऊत, राजू नथू राऊत, रवी पांडुरंग राऊत, सुरज राजू राऊत, सत्यजित ज्ञानोबा राऊत, कुणाल कैलास राऊत, संजू बबन ठाकर, विजय बबन ठाकर, तानाजी गेनू राऊत  (सर्व रा. अंत्रोली, ता. वेल्हे) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

हवेलीच्या उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सई भोरे पाटील, वेल्ह्याचे सहायक पोलिस निरीक्षक मनोज पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार औदुंबर अडवाल, सुरेश मोरे हे तपास करीत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com