आमदार संजय शिंदेंच्या विरोधात शेतकऱ्यांचे अर्धनग्न होत आंदोलन

संजय शिंदे यांच्यावर कारवाई झाली नाही तर ईडी कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.
Sarkarnaa Banner (29).jpg
Sarkarnaa Banner (29).jpg

पुणे : करमाळ्याचे आमदार संजय शिंदे यांच्या मालकीच्या म्हैसगाव येथील विठ्ठल कार्पोरेशन साखर कारखान्याने शेतकऱ्यांच्या नावावर बोगस कर्जे काढल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे करमाळा परिसरातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. त्यांनी आज  कॅम्प परिसरातील पंजाब नॅशनल बॅकेसमोर भीक मागत अर्धनग्न आंदोलन केले.
farmers protest against punjab national bank in pune mla sanjay shinde accused of cheating 

"आमदार संजय शिंदे यांच्यावर कारवाई झाली नाही तर ईडी कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल," असा इशारा अतुल खूपसे यांनी दिला आहे. या आंदोलनामुळे आज पंजाब नॅशनल बॅंकेसमोर तणाव निर्माण झाला होता. करमाळ्याचे आमदार संजय शिंदे यांच्या मालकीच्या म्हैसगाव येथील विठ्ठल कार्पोरेशन साखर कारखान्याने शेतकऱ्यांच्या नावावर बोगस कर्जे उचलल्याचा प्रकार समोर आला आहे. काढलेली कर्ज वेळेत न भरल्याने ती कर्ज भरण्यासंदर्भात पुण्यातील कोथरूडमधील पंजाब नॅशनल बँकेने  वकिलामार्फत शेतकऱ्यांना नोटीसा पाठवायला सुरुवात केली आहे. यासंदर्भात न्याय न मिळाल्याने आज पुण्यातील  पंजाब नॅशनल बँकेच्या कॅम्पमधील विभागीय कार्यालयासमोर अर्ध नग्न आंदोलन करण्यात आले. 

बँकेच्या व्यवस्थापकाला यावेळी निवेदन देण्यात आले. आंदोलक शेतकऱ्यांनी रस्त्यावर मागितलेली भीक बँकेला देण्यात आली. विठ्ठल कॉर्पोरेशन साखर कारखान्याकडून २०१३ मध्ये खत देतो म्हणून, आधार कार्ड, मतदान कार्ड तसेच सातबारा उतारा आणि अनेक ठिकाणी सह्या घेण्यात आल्या. मात्र संबंधित शेतकऱ्यांना खत मिळाले नाही. २०१३ पासून आतापर्यंत कारखाना वआणि बँकेची कोणतीही नोटीस कर्ज भरण्यासंदर्भात आली नाही. मात्र, २९ मेनंतर पंजाब नॅशनल बँकेच्या वकिलांकडून पोस्टाने नोटीस पाठवून कर्जाची रक्कम २ मे पर्यंत भरावी अन्यथा, फौजदारी कारवाई करावी लागेल, असा इशारा वकिलामार्फत पाठविलेल्या नोटिशीत देण्यात आला आहे..

Covishield: लसीच्या दोन डोसमधील अंतर कुणाच्या सल्ल्यावरून दुप्पट?..  

नवी दिल्ली : कोरोना व्हायरस (Coronavirus)ला नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने कोविशिल्ड (Covishield) लसीच्या दोन डोसमधलं अंतर वाढण्याबाबतचा निर्णय जाहीर केला.  कोविशिल्डच्या दोन लसींमधील अंतर वाढवून जवळपास दुप्पट करण्यास वैज्ञानिकांचा पाठिंबाच नव्हता. तज्ज्ञ गटातील 3 सदस्यांनी हा खुलासा केल्याचे समजते.  रॉयटर्सनं यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे. गेल्या महिन्यात १३ मे रोजी केंद्र सरकारने कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर12 ते 16 आठवडे इतकं निश्चित करण्यात आले. अगोदर हे अंतर 6 ते 8 आठवडे होते. हा निर्णय वैज्ञानिकांच्या गटानं केलेल्या शिफारशींनुसार घेतल्याचं देखील सांगितलं गेलं. पण आता त्याच वैज्ञानिकांनी धक्कादायक खुलासा केला आहे. या लशीच्या अंतराबाबर घेतलेल्या निर्णयाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com